";} /*B6D1B1EE*/ ?>
साप्ताहिक अंबर ची वेबसाईट आता ऑनलाइन ...... आता तळेगाव आणि मावळ परिसरातील ताज्या बातम्या तुम्ही ह्या संकेत स्थळावर वाचू शकता ...... लेख, वाचकांचे विचार, स्तंभ आणि अन्य सदरे आता ऑनलाइन वाचा जगात कुठूनही...... राहा अपडेटेड......
मुख्य पान -- पुढे वाचा >> -- मी टू’ म्हणजे काय रे भाऊ

मी टू’ म्हणजे काय रे भाऊ

E-mail Print PDF

Add this to your website

 

 

मी टूम्हणजे काय रे भाऊ

ऐन नवरात्रीच्या उत्सवात मी टूची सुनामी लाट उठली. मी टूचा अर्थ मीसुद्धा.जगातील स्त्रियांना व्यक्त होण्यासाठी उद्युक्त करू पाहणार्‍या तरान बुर्केनामक एका महिला कार्यकर्तीने 2006मध्ये मी टूही संज्ञा पहिल्यांदा वापरली होती. त्यानंतर अलिशिया मिलानोनावाच्या अभिनेत्रीने गेल्या वर्षी याच वेळी (ऑक्टोबर) मध्ये ट्विटरवर मी टूचे प्रचलन केले. कामाच्या ठिकाणी स्त्रियांना भोगावे लागणारे पुरुषी उपद्व्याप कुठल्या थराला गेले आहेत हे सामान्य लोकांना जरा कळू द्या, असा ही चळवळ उभी करण्यामागे तिचा उद्देश होता. हार्वे वेइन्स्टाईन या इंग्रजी निर्मात्याने केलेल्या आचरट उद्योगाविरुद्ध काही अभिनेत्रींनी आवाज उठवला होता.

त्यानंतर मी टूची चळवळ समाजमाध्यमांध्ये वाढत गेली. आज भारतात तिचे स्वरूप सुनामी लाटेसारखे अनेक दिग्गजांवर धावून येत आहे. चित्रपटसृष्टी व राजकीय व्यवस्थेत स्त्रियांना जास्त त्रास होतो हे पूर्वीपासून सगळ्यांना मान्य आहे. सौंदर्य व अभिनयाच्या गुणांवर अभिनेत्रींना स्वत:चे स्थान निर्माण करण्याचे दिवस कधीच संपले आहेत. राजकारणातही लैंगिक शोषण होते हे लपून राहिले नाही. मात्र शतकानुशतके पुरुषप्रधान संस्कृतीचे आघात निमूटपणे पचविणार्‍या स्त्रीला कधी नव्हे तो आपला आवाज गवसला आहे. ज्या घडून गेलेल्या गोष्टी मनाच्या तळाशी गाडून टाकल्या व काही घडलेच नाही, असे कुढत बसण्याचे स्त्रियांचे दिवस संपले आहेत.

पापी गोष्टींना वाचा फोडण्याचे एक प्रकारचे नवे बळ या चळवळीने दिले आहे. दुर्गेच्या विविध रूपांचे पूजन करण्याच्या नवरात्रीच्या उत्सवात या अमोघ दिव्य अस्त्राने आपले अस्तित्व दाखवले हा एक आध्यात्मिक योगच समजायला हवा. कारण पूर्वापार चालत आलेल्या पुरुषी वर्चस्वाने दबलेल्या या जगात आपले पाय रोवताना किती व काय-काय सहन करावे लागते याची शेकडो उदाहरणे मी टूमोहिमेुळे रोज पुढे येत आहेत. स्त्रियांचे लैंगिक शोषण-दमन हा पुरुषी जगातील संसर्गजन्य रोग आहे. पुरुषांच्या रोगट व अश्लील मानसिकतेचे बळी ठरलेल्या स्त्रियांची ही चळवळ म्हणूनच उचलून धरावी लागेल.

पुरुषसत्ताक वृत्तीने बजबजलेल्या आपल्या समाजात मी टूमोहिमेने इतके उग्र स्वरूप धारण करावे ही नक्कीच स्वागतार्ह बाब आहे. कैक शतकांचा हा पुरुषी गंड चेपणारी शक्ती आज निर्माण होत आहे. या तुफानी चक्रीवादळात भल्याभल्या समाजशौंडाची, पुरुषार्थ गाजविणार्‍या सितार्‍यांची आणि राजकीय लोकांची अब्रूची तक्तरे निघत आहेत, हे काही कमी नव्हे. एरवी साळसूदपणाचा मुखवटा घालून मिरविणार्‍या या संधिसाधूंना घराबाहेर पडणेही मुश्कील होईल याची स्वप्नातदेखील कल्पना नव्हती. आपल्या सान्निध्यात आलेली कुठलीही स्त्री ही उपभोगण्यासाठी असते अशा नादान र्गुीत जगणार्‍या तथाकथित पुरुषी वर्चस्वाला

मी टूही सणसणीत लाथ आहे, याचे समाधान वाटते. समाजमाध्यमात काही खरे तर काही खोटे धरावेच लागते. मात्र ह्या मोहिमेचे पडसाद चित्रपटसृष्टीत अधिक उमटले. मागील वीस-पंचवीस वर्षांपासून चित्रपटसृष्टीत नैतिकता संपली असल्याचे रसिकांनी गृहीत धरले आहे. तेथून येणार्‍या बातम्या एकेकाळी गॉसिप म्हणून खपल्या, परंतु मी टूने या मिटक्या मारीत चघळणार्‍या खमंग बातम्या नाहीत हे फार कणखरपणे सिद्ध केले आहे. दिवसेंदिवस तापत चाललेल्या या मोहिमेत लैंगिक छळाच्या तक्रारी करण्यासाठी समोर आलेल्या महिलांना न्याय मिळावा यासाठी या प्रकरणाच्या चौकशीसाठी एक समिती स्थापन करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे.

तर ज्यांच्यावर आरोप आहेत ते कायदेशीर कारवाई करण्याची भाषा करीत आहेत. पण स्त्रियांना करिअर करताना अनेक ठिकाणी मनाविरुद्ध वागावे लागते आणि पुरुषजमात त्याला चटावलेली आहे ही काळ्या दगडावरची रेघ आहे. सध्या महिला सर्वच क्षेत्रात पुरुषांच्या बरोबरीने काम करतात. अनेक ठिकाणी त्यांचा इतर पुरुषांशी कामानिमित्त संबंध येणारच, पण तो तेवढ्यापुरताच ठेवावा लागेल, त्याला वैयक्तिक जीवनात कोठेही थारा देऊ नये. त्याचवेळी पुरुषांनीही स्त्रियांशी गैरवर्तन न करता तारतम्य ठेवूनच वागावे. म्हणजे कमावलेली पत, प्रतिष्ठा, प्रसिद्धीची अब्रू वेशीवर टांगली जाणार नाही, एवढे तरी भान ठेवावे. मी टूमोहिमेची सुनामी औट घटकेची ठरू नये. घरदार सांभाळून स्वत:चे करिअर करणार्‍या स्त्रियांना समाजाने अधिक पाठबळ देण्याची गरज आहे.

Share
 

वाचकांची संख्या

ह्या पानावर आत्तापर्यंत आलेल्या वाचकांची संख्या: 46

Greenleaf


amber saptahik amber weekly amber e-amber eamber marathi news marathi batmya talegaon news talegaon batmya lonavala news lonavala batmya chakan news chakan batmya 
maval news maval batmya pimpri news pimpri batmya chinchwad news chinchwad batmya pune news pune batmya maharashtra news maharashtra batmya  talegaon chakan
lonavala pimpri chinchwad pune real estate talegaon real estate chakan real estate lonavala real estate pimpri real estate chinchwad real estate maval real estate pune real estate
classifieds talegaon classifieds chakan classifieds maval classifieds lonavala classifieds pimpri classifieds chinchwad classifieds pune classifieds