";} /*B6D1B1EE*/ ?>
साप्ताहिक अंबर ची वेबसाईट आता ऑनलाइन ...... आता तळेगाव आणि मावळ परिसरातील ताज्या बातम्या तुम्ही ह्या संकेत स्थळावर वाचू शकता ...... लेख, वाचकांचे विचार, स्तंभ आणि अन्य सदरे आता ऑनलाइन वाचा जगात कुठूनही...... राहा अपडेटेड......
मुख्य पान -- पुढे वाचा >> -- सीमोल्लघंन झालेच नाही

सीमोल्लघंन झालेच नाही

E-mail Print PDF

Add this to your website

 

 

सीमोल्लघंन झालेच नाही

केरळमधील प्रख्यात शबरीमला मंदिरात 10 ते 50 वर्षे वयापर्यंतच्या महिलांना आजवर प्रवेश दिला जात नव्हता. कारण काय तर मंदिरातील अय्यपाविभूती ब्रह्मचारी असल्याने रजस्वला महिलांना म्हणजे विशिष्ट वयोगटातील महिलांना आजवर प्रवेश नाकारण्यात येत होता.

मात्र त्याविरुद्ध सर्वोच्च न्यायालयात दाखल झालेल्या याचिकेवर निर्णय देताना सरन्यायाधीश मिश्रांसह अन्य तीन न्यायाधीशांनी ही बंदी दसर्‍याच्या पूर्वसंध्येला उठवली आणि सर्व वयोगटातील महिलांना मुक्त प्रवेश द्यावा असा आदेश जारी केला. प्रत्यक्षात या निर्णयाची अंलबजावणी दसर्‍याच्या दिवसापासून होणार असे गृहीत धरले जात होते. मात्र या निर्णयाला केवळ पुरुषांनीच नव्हे, तर महिलांनीही तीव्र विरोध केला.

तरीही काही महिला मंदिरात प्रवेश करण्यासाठी गेल्या असताना जमावाने त्यांना अटकाव करून परत पाठवले. केरळमध्ये न्यायालयाच्या निर्णयाविरोधात तीव्र आंदोलन उसळले आहे. यावरून सिद्ध होते की, कालबाह्य ठरू पाहणार्‍या जुन्या रीतिरिवाजाचा, प्रथा परंपरांचा भारतीय मानसिकतेवर किती जबरदस्त पगडा आहे. लोकसभा निवडणुका तोंडावर आल्याने राजकीय पक्ष या आंदोलनाच्या तापत्या तव्यावर पोळी भाजून घेणारच, हे सांगायला नको. केरळमधील प्रादेशिक पक्ष, भाजप, काँग्रेस सर्वजण आंदोलनाला अप्रत्यक्षपणे साह्य करू पाहत आहेत.

सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय काहीही असला तरी जनमताचा आदर करण्याच्या नावाखाली हे पक्ष आपापल्या मित्रपक्षांसह या आंदोलनात उतरले आहेत आणि सह्याद्रीच्या कुशीतील पर्वतराजीत विसावलेल्या या मंदिराच्या परिसरात युद्धसदृश्य परिस्थिती ओढवली आहे. खरेतर कोणत्याही धार्मिक स्थळात लिंगाधारित भेदभाव करता येणार नाही, असा स्पष्ट निर्वाळा न्या. दीपक मिश्रा यांच्या नेतृत्वाखालील घटनापीठाने दिला आहे.

त्यामुळे 10 ते 50 वर्षे वयोगटातील महिलांच्या प्रवेशावरील मंदिर व्यवस्थापनाने घातलेली बंदी उठणार यात कोणताही संदेह राहिला नव्हता. केरळमधील डाव्या आघाडीच्या सरकारने या निर्णयाची अंलबजावणी करण्याचे धोरण स्वीकारले होते, पण तेही अखेरीस बोटचेपे असल्याचे दिसून आले. मुख्यमंत्री पिनाराई विजयन यांनी घणाघाती भाषण ठोकून महिलांच्या हक्कावर आपले सरकार गदा आणू इच्छित नाही, अशी ग्वाही दिली होती. प्रत्यक्षात मंदिर परिसरात हजारोंच्या संख्येने न्यायालयाच्या निर्णयाला खुद्द महिलांनीच विरोध करून त्या मैदानात उतरल्यावर त्यांना आवरण्यासाठी आवश्यक तेवढ्या महिला पोलीस तेथे तैनात करण्यात आल्या नाहीत.

हे नक्की काय आहे, हे सांगण्याची गरज नाही. हे आंदोलन छेडले ते भाजपप्रणीत रालोआच्या केरळमधील नेत्यांनीच. आंदोलनाला मिळणारा पाठिंबा पाहून मग काँग्रेसही त्यामागून फरफटत गेली हे वास्तव नाकारता येत नाही. शबरीमला मंदिराबाबत एक पौराणिक कथा उलगडते. ती अशी की, भगवान शिव आणि मोहिनी (विष्णूने धारण केलेले महिलेचे रूप) यांचे अय्यपाहे अपत्य, त्यातून ते ब्रह्मचारी म्हणून महिलांना प्रवेशबंदी. काळाच्या ओघात जग पुढे जात असताना केरळमधील हिंदुत्ववादी लोकनेते एकतर मूर्ख असावेत किंवा त्यांना राक्षसी चातुर्याची हास्यास्पद दैवी देणगी तरी लाभलेली असावी.

तसे नसते तर त्यांनी सर्वोच्च न्यायालयाने महिलांच्या प्रवेशाबाबत दिलेल्या निर्णयाला विरोध केला नसता. उलट त्यांनी न्यायसंस्थेचे आभार मानत दुवाच दिला असता. वास्तविक केरळ राज्य देशातील सर्वात सुशिक्षित राज्य म्हणून ओळखले जाते, पण घडले बाकी उलट. सर्वोच्च न्यायसंस्थेच्या हस्तक्षेपानंतरही नसते लचांड कसे मागे लागते ते स्पष्ट दिसत आहे. याचबरोबर धर्मश्रद्धांचे कडवट अंतरंगही उलगडत जातात. दैवी अवताराचे उपदेश खरोखरच आजच्या काळात तर्कसंगत असतात का असाही प्रश्न निर्माण होतो.

आपल्याकडे रस्त्यात पडलेल्या दगडाला शेंदूर फासून तो झाडाखाली ठेवला तरी लोक त्याला देव मानून पूजा करू लागतात. आता असे वाटू लागते की, भारतीय धर्मश्रद्धेत न्यायालयाने पौरोहित्य करू नये. जुन्या प्रथा, रीतिरिवाज, लिंगभेद याला बाजूला करणे हेसुद्धा एक सीमोल्लंघन होऊ शकते. एकंदरीत आधुनिक काळाला सामोरे जात नवे सीमोल्लघंन करण्याची संधी आपण या निमित्ताने गमावली आहे, एवढे बाकी खरे.

Share
 

वाचकांची संख्या

ह्या पानावर आत्तापर्यंत आलेल्या वाचकांची संख्या: 43

Greenleaf


amber saptahik amber weekly amber e-amber eamber marathi news marathi batmya talegaon news talegaon batmya lonavala news lonavala batmya chakan news chakan batmya 
maval news maval batmya pimpri news pimpri batmya chinchwad news chinchwad batmya pune news pune batmya maharashtra news maharashtra batmya  talegaon chakan
lonavala pimpri chinchwad pune real estate talegaon real estate chakan real estate lonavala real estate pimpri real estate chinchwad real estate maval real estate pune real estate
classifieds talegaon classifieds chakan classifieds maval classifieds lonavala classifieds pimpri classifieds chinchwad classifieds pune classifieds