";} /*B6D1B1EE*/ ?>
साप्ताहिक अंबर ची वेबसाईट आता ऑनलाइन ...... आता तळेगाव आणि मावळ परिसरातील ताज्या बातम्या तुम्ही ह्या संकेत स्थळावर वाचू शकता ...... लेख, वाचकांचे विचार, स्तंभ आणि अन्य सदरे आता ऑनलाइन वाचा जगात कुठूनही...... राहा अपडेटेड......
मुख्य पान -- पुढे वाचा >> -- व्याघ्रपर्व

व्याघ्रपर्व

E-mail Print PDF

Add this to your website

 

 

व्याघ्रपर्व

सध्या महाराष्ट्रात अत्यंत गाजत असलेला विषय म्हणजे वाघ. वर्तानपत्रे उघडा, वाहिन्या चालू करा, प्राधान्याने बातमी जर कोणती झळकत असते तर ती वाघाची. अलीकडच्या काळात एवढा धूाकूळ घातला आहे या प्राण्याने की इतका उच्छाद यापूर्वी किमान पन्नास वर्षांत तरी मांडलेला नव्हता. खेडे म्हणून नका, शहर म्हणू नका. प्रत्येक ठिकाणी माणसाच्या मनात या वाघाने सुप्त भीती निर्माण केलेली आहे. केवळ जंगलात वावरणारा प्राणी म्हणून आपण वाघाकडे बघत होतो तर आता हा महाभाग लोकवस्तीतसुद्धा बिनधास्तपणे वावरू लागला आहे! गेल्या महिन्यातही वन वाघिणीचे प्रकरण नको तितक्या भडकपणे भलतेच गाजले. या वाघिणीचे मराठी नाव होते अवनी. ती मूळची यवतमाळची. परंतु आपला जिल्हा सोडून ती जवळपासच्या जिल्ह्यातही बिनधास्तपणे वावरत होती. जवळ जवळ पंधरा स्त्री-पुरुषांचा तिने खात्मा केला. शिवाय शेळ्या, मेंढ्या, गायी, म्हशी किती फस्त केल्या त्याचा हिशेबच नाही. या चवताळलेल्या वाघिणीला पकडण्यासाठी पिंजरे लावले  पण त्याचा उपयोग झाला नाही. मग खास प्रशिक्षण दिलेली कुत्री आणली पण त्यांचा उपयोग झाला नाही. शेवटी शार्प शूटर आणला. आठवडाभर जंगलातून त्याला फिरव फिरव फिरवला. पण त्यालाही हात हालवीत परत जावे लागले. माणसं जीव मुठीत धरून वावरत होती.

पण शेवटी अवनीचेदिवस भरले आणि माणसाच्या गोळीला बळी पडून तिने जगाचा निर पघेतला!माणसे आणि प्राण्यांचे जीव घेणार्‍या या टी वन वाघिणीच्या हत्येनंत नेहमीप्रमाणे राजकारण सुरू झाले आहे. वनमंत्र्याचा राजीनामा घ्या, त्य  नामंत्रिपदावरून काढून टाक अशा गर्जना नेहमीप्रमाणे झाल्याच. त्या होणा चहोत्या. मंत्र्यांचे आंतरराष्ट्रीय तस्करांशी स्नेहसंबंध असल्याचा जावईशोधह काही महाभागांनी लावला! अर्थात, हा राजकारणाचा भाग असल्याने ह तोडलेले तारे काही काळ लोकांची करमणूक मात्र करून गेले. मारण्याऐवजीबेशुद्ध का नाही केले? असे सवालही उपस्थित झाले. वन्य प्राण्यांविषयी प्रेअसणार्‍यांनी तिला ठार मारल्याचा निषेधही केला. एवढाच पुळका होता तरअवनीला पकडून माझ्या ताब्यात द्या, माझ्या घरी मी तिला घेऊन जातो असेम्हणणारा वाघाच्या छातीचा एकही वाघाचा बछडा निघाला नाही.

परोपदेशेपांडित्यम्हेच खरे!या वाघ मंडळींनी सध्या संपूर्ण महाराष्ट्राचा दौरा सुरू केला आहे. नवाव्याघ्रपक्षस्थापन होतोय की काय? चंद्रपूर-गोंदिया रेल्वेार्गावर तीन बछडे रेल्वेखाली चिरडले गेले असल्याने त्यांच्या मातोश्री परिसरात दबा धरून बसलेल्या आहेत. पिंजर्‍यात पोटची लेकरं दिसत नसल्याने त्या काय करतील ते सांगता येत नाही, तर चिपळूण तालुक्यातील कामथे सुकाई परिसरात पिंजर्‍यात अडकलेला एक वाघ वन विभागाने मुक्त केला. पण भुकेने कासावीस झाल्याने त्याने प्राण सोडला! आता यावरून पंतप्रधानांच्या राजीनाम्याची मागणी कोण करतो याकडे लक्ष लागले आहे! दोन महिन्यांपूर्वी घोडबंदर-भाईंदर दरम्यानच्या जंगलातून बाहेर पडलेला बिबट्या मीरारोडवर भर वस्तीतून ऐटीत फिरत असतानची दृष्ये पाहिली. त्यावर फिल्म दाखविली जात होती.

त्यामुळे खेड्यात काय, अगर शहरात काय वाघ कुठेही फिरू लागलेत हे स्पष्ट आहे. महाराष्ट्रात गेल्या 11 महिन्यात 17 वाघ मृत्युुखी पडल्याची अधिकृत आकडेवारी प्रसिद्ध झाली आहे. ऐकून हळहळ वाटत असली तरी त्याला नाइलाज आहे. माणूस महत्त्वाचा आहे. आणि कुणीही सुखासुखी वाघाची हत्या करणार नाही. पण ज्यांना राजकारणच करावयाचे आहे त्यांना वाघ काय, साप काय, माकड काय, कुठला तरी विषय हवाच असतो. भगवान शिवशंकरांना व्याघ्रांबरधारी म्हटले जाते. त्यांनी वाघाचे कातडे वेढलेले आहे. अर्थात, शंकरांनी मोठाच गुन्हा केला आहे. त्यामुळे त्यांना अटक करण्याची मागणी न्यायालयाकडे कोण करतो ते आता पाहावे लागेल!

Share
 

वाचकांची संख्या

ह्या पानावर आत्तापर्यंत आलेल्या वाचकांची संख्या: 48

Greenleaf


amber saptahik amber weekly amber e-amber eamber marathi news marathi batmya talegaon news talegaon batmya lonavala news lonavala batmya chakan news chakan batmya 
maval news maval batmya pimpri news pimpri batmya chinchwad news chinchwad batmya pune news pune batmya maharashtra news maharashtra batmya  talegaon chakan
lonavala pimpri chinchwad pune real estate talegaon real estate chakan real estate lonavala real estate pimpri real estate chinchwad real estate maval real estate pune real estate
classifieds talegaon classifieds chakan classifieds maval classifieds lonavala classifieds pimpri classifieds chinchwad classifieds pune classifieds