";} /*B6D1B1EE*/ ?>
साप्ताहिक अंबर ची वेबसाईट आता ऑनलाइन ...... आता तळेगाव आणि मावळ परिसरातील ताज्या बातम्या तुम्ही ह्या संकेत स्थळावर वाचू शकता ...... लेख, वाचकांचे विचार, स्तंभ आणि अन्य सदरे आता ऑनलाइन वाचा जगात कुठूनही...... राहा अपडेटेड......
मुख्य पान -- पुढे वाचा >> -- वेध निवडणुकांचे

वेध निवडणुकांचे

E-mail Print PDF

Add this to your website

 

 

वेध निवडणुकांचे

पुढील वर्षी लोकसभा आणि राज्याच्या विधानसभा निवडणुका होणार आहेत. 2019 साल त्या दृष्टीने खूपच महत्त्वाचे आहे. एप्रिलच्या दरम्यान दिल्लीसाठी तर ऑक्टोबर दरम्यान मुंबईसाठी लोकप्रतिनिधी निवडून द्यायचे आहेत. निवडणुकांची हवा आत्तापासूनच तापायला आरंभ झाला आहे. इच्छुक मंडळी गुडघ्याला बाशिंग बांधून आतापासूनच तयार व्हायला लागली आहेत. मोठ्या मजेचा काळ आता सुरू होणार आहे. ज्यांना तिकिटे मिळतील ते खूष तर ज्यांना मिळणार नाहीत ते नाखूष हे नेहमीचेच चित्र! मग ऐनवेळी पक्ष सोडून दुसर्‍या पक्षात प्रवेश, मोठ्या उत्साहाने नवागताचे स्वागत हे ओघोन आलेच.

हे नेहमीचे चित्र बघून लोकांना आता कंटाळा आलेला आहे. येत्या महिन्याभरात पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुका होणार आहेत. त्या फार महत्त्वाच्या आहेत. विशेषत: राजस्थान व मध्य प्रदेश ही दोन मोठी राज्ये निवडणुकांना सामोरी जात असून त्यांचे निकाल पुढच्या निवडणुकांवर परिणाम करणारे ठरू शकतात. राजस्थान व मध्य प्रदेशात सध्या भारतीय जनता पक्षाची सरकारे असल्याने सत्ता टिकवण्याचे आव्हान त्या पक्षापुढे आहे. वसुंधराराजे राजस्थानात तर शिवराजसिंग चौहान मध्य प्रदेशात मुख्यमंत्री म्हणून काम पाहात आहेत. या दोघांपुढेही भारतीय जनता पक्षाची प्रतिष्ठा जतन करण्याची मोठी जबाबदारी आहे. गेल्या पाच वर्षांत त्यांनी कशा पद्धतीने कारभार केला त्याचा हिशेबच जनता या निमित्ताने देणार आहे. वाहिन्यांनी जी सर्वेक्षणे केली त्यामधून राजस्थान व मध्य प्रदेश ही दोनही राज्ये भारतीय जनता पक्षाच्या हातातून जाणार असल्याचे अंदाज वर्तविले आहेत.

भाजपच्या गोटात अस्वस्थता स्वाभाविकपणे पसरणार हे उघड आहे. अर्थात, हे अंदाज आहेत. दोनही राज्यात आम्हीच पुन्हा सत्तेवर येणार अशा गर्जना करून कार्यकर्त्यांचे मनोबल शाबूत ठेवण्याचा प्रयत्न भाजप नेते करणारच. प्रत्यक्षात काय होणार ते महिन्याभरात कळेलच. एका अंदाजानुसार राजस्थानातील जनता वसुंधराराजेंना टाटा करणार असून मध्य प्रदेशात शिवराजसिंग चौहान काठावर तरणार असल्याचे राजकीय निरीक्षक सांगतात. नेके काय ते 11 डिसेंबरला कळेलच. राजकारण आणि सत्ता यांचा अन्योन्य संबंध आहे.

राजकारण हे सत्तेसाठीच करायचे असते. लोकांची सेवा हा खरा मुद्दा असला तरी प्रसिद्धी, पैसा, प्रतिष्ठा या बाबींना जास्त महत्त्व दिले जाते. म्हणूनच निवडून येण्यासाठी भले-बुरे सर्व मार्ग चोखाळले जात असतात. जनतेची सेवा, राष्ट्राचा विकास हे मुद्दे दुय्यम ठरलेले आहेत. म्हणूनच राजकारणात नको त्या माणसांचा शिरकाव झालेला आहे. नीतिमान, विचारी, सदाचरणी माणसांना निवडणुकांच्या रिंगणात प्रवेश मिळणे अशक्य झालेले आहे.

निवडून यायचे तर पाण्यासारखा पैसा खर्च करता यायला हवा, मनगटशाही दहशतवादाचा आधार घ्यायला हवा. जातीवादाचे विष पेरता यायला हवे असेच समीकरण दृढ झालेले आहे. यात कोण आणि केव्हा बदल करू शकेल ते आज तरी सांगता येणार नाही. 2014 साली भारतीय जनता पक्षाने स्वबळावर केंद्रातील सत्ता संपादन केली. वर्षानुवर्षे लोकांच्या मनावर असलेला काँग्रेसचा पगडा सैल झाला. याचाच अर्थ देशात आता खरी लोकशाही सजू लागली आहे.

नरेंद्र मोदी यांच्या रूपाने एक कणखर, ध्येयवादी पंतप्रधान देशाला मिळाला. लोकांनी खरा विचार केला तर स्वप्नातील विकसित भारत प्रत्यक्षात आणून दाखविण्याची क्षमता या पंतप्रधानांकडे निश्चितपणे आहे. तरीसुद्धा सत्तेच्या राजकारणासाठी लोकांचा बुद्धीभेद करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. चार वर्षांत फारसे काही हाती न लागल्याने आता राफेलचा मुद्दा उकरून काढण्यात आला आहे. नेहमीप्रमाणे राईचा पर्वत करण्याची प्रवृत्ती बळावलेलीच आहे. पण शहाणी होत चाललेली जनता वेड्यासारखी वागणार नाही हे निश्चित!

Share
 

वाचकांची संख्या

ह्या पानावर आत्तापर्यंत आलेल्या वाचकांची संख्या: 50

Greenleaf


amber saptahik amber weekly amber e-amber eamber marathi news marathi batmya talegaon news talegaon batmya lonavala news lonavala batmya chakan news chakan batmya 
maval news maval batmya pimpri news pimpri batmya chinchwad news chinchwad batmya pune news pune batmya maharashtra news maharashtra batmya  talegaon chakan
lonavala pimpri chinchwad pune real estate talegaon real estate chakan real estate lonavala real estate pimpri real estate chinchwad real estate maval real estate pune real estate
classifieds talegaon classifieds chakan classifieds maval classifieds lonavala classifieds pimpri classifieds chinchwad classifieds pune classifieds