";} /*B6D1B1EE*/ ?>
साप्ताहिक अंबर ची वेबसाईट आता ऑनलाइन ...... आता तळेगाव आणि मावळ परिसरातील ताज्या बातम्या तुम्ही ह्या संकेत स्थळावर वाचू शकता ...... लेख, वाचकांचे विचार, स्तंभ आणि अन्य सदरे आता ऑनलाइन वाचा जगात कुठूनही...... राहा अपडेटेड......
मुख्य पान -- पुढे वाचा >> -- महायुद्धाची शंभरी

महायुद्धाची शंभरी

E-mail Print PDF

Add this to your website

 

 

महायुद्धाची शंभरी

मानव आदिमकाळापासून एकमेकांशी लढत आहे. अगदी पूर्वींचा नाही, तर मागील दोन हजार वर्षांचा इतिहास लक्षात घेतला तर अनेक वेळा लढाय  झाल्या आहेत, पण पहिल्या जागतिक महायुद्धाची व्याप्ती प्रंचड मोठी होती. जमिनीवरून, खालून, समुद्र व तळातून, आकाशात होणारा शस्त्रास्त्रांचा भयप्रद कर्कश आवाज थांबला 11 नोव्हेंबर 1918 रोजी आणि सर्व जगाने सुटकेचा नि:श्‍वास टाकला. त्याला शंभर वर्षे पूर्ण झाली. जगातील बहुतेक देशांनी प्रत्यक्ष व अप्रत्यक्षरीत्या या युद्धात सहभाग घेतला होता. सतत चा  वर्षे व तीन महिने झालेल्या युद्धात नव्वद लाख सैनिक व सत्तर लाख निष्पाप नागरिकांचा बळी गेला. अडीच लाख लोक जखमी झाले.

अपंग, बेघर, विस्थापित, आर्थिक नुकसानीचा आकडा प्रंचड मोठा होता. या महासंहारक महायुद्धाच्या समाप्तीला नोव्हेंबर 18 मध्ये शंभर वर्ष पूर्ण झाली असली तरी माणूस पुन्हा तिसर्‍या महायुद्धाच्या दिशेने आजही प्रवास करीत आहे याची भीती वाटते. इतके विनाशकारी युद्ध का झाले असावे या प्रश्नाचे उत्तर शोधण्यासाठी त्या काळातील आंतरराष्ट्रीय राजकारणाचा अभ्यास केला तर माणूस फक्त सुधारला आहे, मात्र आजही त्याच्यात राक्षसी आदिमशक्तीवावरत आहेत, हेच वारंवार सिद्ध होते. एकमेकांवर कुरघोडी आणि दुबळ्य राष्ट्रांना हीन वागणूक देणे यातून आज सैतानी मस्तके, दहशतवादी, अतिरेकी संघटना म्हणून उदयास येत आहेत.

शंभर वर्षांपूर्वी जगातील मोजकीच राष्ट्रे सुखात नांदत होती व अनेक राष्ट्रे भूक व दारिद्य्रात खितपत पडली होती. आजही ती परिस्थिती बदलली नाही. म्हणूनच अमेरिकेला धडा शिकविण्यासाठी जगातील सर्वोच्च आर्थिक व्यवहाराचा टॉवर जमीनदोस्त केला जातो. पहिल्या महायुद्धाची मूळ कारणे काय आहेत हे ठरवणे अवघड आहे. मात्र या काळात सर्वच प्रमुख राष्ट्रे एकमेकांकडे कुत्सित भावनेने पाहत होती. अशा तप्त वातावरणात युद्धाची ठिणगी पडली ती एका क्रूर घटनेने. ऑस्ट्रियाचा राजपुत्र आर्चड्यूक व पत्नी सोफिया यांची हत्या झाली आणि मग 51 महिने युद्धात जग होरपळून गेले.

तो काळ असा होता की त्याकाळी आजच्यासारखी संहारक अणवस्त्रे नव्हती, अन्यथा मानव जात नावालाही राहिली नसती. जर्मनीचा हुकूमशहा अ‍ॅडॉल्फ हिटरलने देखील जगावर सत्ता राखण्याच्या लालसेने दुसरे महायुद्ध लादले. त्याकाळातही मानवी संहार झालाच. हिटलरला साथ देणार्‍या जपानला धडा शिकवण्यासाठी अमेरिकेने हिरोशिमा व नागासकी शहरे क्षणार्धात उद्ध्वस्त करून अडीच लाख लोकांना यमसदनी पाठवले. जे वाचले त्यांचे वंशज आजही कातडीच्या रोगाने जर्जर आहेत असा तो अणुबाँम्ब होता. केवळ सत्ता गाजवण्यासाठी निष्पाप नागरिकांचा बळी गेला, पण युद्धखोरांना कोणतेच सोयरसुतक नव्हते. पहिले व दुसरे महायुद्ध जगावर सत्ता गाजवण्याच्या लालसेने झाले. ज्या पॅरीसमधून पहिल्या महायुद्धाला सुरुवात झाली, त्याच ठिकाणी 12 नोव्हेंबर 2018 रोजी जगातील सर्व बडे नेते युद्धातील हुताम्यांना आदरांजली वाहण्यासाठी एकत्र आले होते, पण तेथेही एकवाक्यता किंवा बंधूभाव दिसून आला नाही.

शंभर वर्षांपूर्वी घडलेल्या या युद्धाचा आढावा घेतल्यानंतर असे वाटते की, बुद्धिवादी माणसाने इतिहासापासून काही बोध घेतला की नाही? अमेरिका, दक्षिण कोरिया, रशिया, चीन, इस्लामिक राष्ट्रे आजही एकमेकांवर दात खाऊन वाटचाल करत आहेत. डोनाल्ड ट्रम्प व किम जोंग यांच्यात विळ्या- भोपळ्याचे नाते आहे. चीन भारताच्या वारंवार खोड्या काढत आहे, तर पाकचे शेपूट कुत्र्यासारखे कायम वाकडेच राहणार आहे. शंभर वर्षांच्या तुलनेत या सर्वांकडे अति संहारक अणवस्त्रे आहेत. यदाकदाचित तिसरे महायुद्ध झालेच तर यातून होणारा विध्वंस मानवाला सर्वनाशाकडे नेणारा असेल. अशा परिस्थितीत भारतासारख्या शांताताप्रेी अलिप्तवादी राष्ट्राची भूमिका महत्त्वाची ठरेल असं वाटतं. विेशशांतीचा संदेश मानवतावाद, मूल्ये, संस्कृती, सभ्यता आणि सर्वात म्हणजे पृथ्वीचा विनाश होऊ नये याची जाणीव सर्वच देशांना होणे गरजेचे आहे.

Share
 

वाचकांची संख्या

ह्या पानावर आत्तापर्यंत आलेल्या वाचकांची संख्या: 45

Greenleaf


amber saptahik amber weekly amber e-amber eamber marathi news marathi batmya talegaon news talegaon batmya lonavala news lonavala batmya chakan news chakan batmya 
maval news maval batmya pimpri news pimpri batmya chinchwad news chinchwad batmya pune news pune batmya maharashtra news maharashtra batmya  talegaon chakan
lonavala pimpri chinchwad pune real estate talegaon real estate chakan real estate lonavala real estate pimpri real estate chinchwad real estate maval real estate pune real estate
classifieds talegaon classifieds chakan classifieds maval classifieds lonavala classifieds pimpri classifieds chinchwad classifieds pune classifieds