";} /*B6D1B1EE*/ ?>
साप्ताहिक अंबर ची वेबसाईट आता ऑनलाइन ...... आता तळेगाव आणि मावळ परिसरातील ताज्या बातम्या तुम्ही ह्या संकेत स्थळावर वाचू शकता ...... लेख, वाचकांचे विचार, स्तंभ आणि अन्य सदरे आता ऑनलाइन वाचा जगात कुठूनही...... राहा अपडेटेड......

‘हे राम’

E-mail Print PDF

Add this to your website

 

 

हे राम

नरसिंह राव पंतप्रधान असताना अयोध्येतील बाबरी मशिद रामभक्तांनी उद्ध्वस्त केली. कारण त्या ठिकाणी राममंदिर होते अशी भावना हिंदुस्थानची झाली होती. मुघल सम्राट बाबर याने राममंदिर उद्ध्वस्त करून तेथे स्वत:च्या नावाची बाबरी मशिद उभी केली, असा भारतीय नागरिकांचा दावा आहे. 1990 साली राममंदिर पुन्हा उभे करू अशा घोषणेने अटलजीसत्तेवर आले. ते गेले पण मंदिर आजही उभे राहिले नाही ही वस्तुस्थिती आहे.

या घटनेला आता जवळजवळ तीन दशके पूर्ण होत आहेत, तर मंदिराचा प्रश्न न्यायालयात आहे. न्यायालयाच्या मते हा प्रश्न सर्वोच्च होऊ शकत नाही. सर्वांशी सामोपचाराने, विचारात्मक तोडगा नंतरही काढता येईल. तरीही मंदिराचा प्रश्न आजच का उफाळून आला याचे उत्तर म्हणजे 2019 मध्ये होणार्‍या लोकसभा व महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुका तसेच डिसेंबर 2018 मध्ये होणार्‍या पाच राज्यातील विधानसभा निवडणुका यात दडले आहे. त्यात शिवसेनेने आक्रमक भूमिका घेतली आहे.

पहले मंदिर फिर सरकारअसा नारा देत सेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांसह थेट अयोध्यानगरी गाठली. अयोध्येत शरयू नदीकिनारी त्यांनी महाआरती केली. त्यांना विेश हिंदू परिषदेच्या धर्मसंस्थेने उत्स्फूर्त साथ दिली. भाजप व सेनेची युती होईल तेव्हा होईल, मात्र त्या आधीच शिवसेनेची युती विहिंप बरोबर नक्कीच झाली आहे. किमान राममंदिराच्या प्रश्नावरून तरी भाजप नव्हे तर शिवसेना विहिंपच्या बरोबर आहे हे ठाकरे यांनी सिद्ध केले आहे. शिवाय संघ परिवारही मंदिरासंबंधी आग्रही आहे. 2014च्या निवडणुकीत बहुताने सत्तेवर आलेल्या भाजपने राममंदिर उभारण्याचे ओशासन दिले होते. पण मंदिर आजही उभे राहिले नाही. तोच मुद्दा शिवसेनेच्या पथ्यावर पडला आहे.

याच मुद्द्यावरून भाजपची कोंडी करून येत्या विधानसभा निवडणुकीत भाजपकडून जास्तीत जास्त जागा पदरात कशा पडतील असे सेनेचे राजकारण दिसते. त्यामुळे भाजप, विहिंप, संघ परिवार यांनी अडीच दशकांपूर्वी उपस्थित केलेल्या राममंदिराच्या प्रश्नावर आमचाही हक्क आहे, हे शिवसेनेला दाखवून द्यायचे आहे. त्यामुळेच उद्धव यांनी थेट अयोध्येचा रस्ता धरला व तेथे जाऊन या विषयावर सरकार काहीच करत नाहीअशा शब्दांत पंतप्रधान मोदींना लक्ष्य केले. या प्रश्नावरून सरकारला धारेवर धरताना भाजपशी युती करावीच लागेल याची त्यांना पूर्ण कल्पना आहे.

त्याआधीच संघ परिवार व विहिंपला हाताशी धरून भाजपशी युती करताना सेनेचा कसा फायदा होईल हे साध्य करण्याचा त्यांचा प्रयत्न म्हणजे अयोध्या वारी’. भाजप व सेना महाराष्ट्रात सत्तेत आहेत, पण भाजपने काही अंतर ठेवून त्यांना सत्तेत घेतले आहे. सर्व प्रमुख खाती भाजपने कब्जात ठेवली आहेत. त्यामुळेच विधानसभा जागांचे वाटपही लोकसभेच्या वेळीच व्हावे असा दबावतंत्राचा खेळ असावा असे वाटते. उद्धव यांनी शेतकरी, दुष्काळ, बेरोजगारी आदी विषयांना हात न लावता थेट राममंदिराचा मुद्दा उचलून धरला आहे.

उद्धव यांनी निवडलेला पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकीचा मुहूर्त अगदी योग्य वेळी साधला आहे. त्याच वेळी सर्वांनी लक्षात घ्यायला हवे की राममंदिराचा विषय हा सर्वोच्च न्यायालयात आहे. सरकारने याबाबत अध्यादेश काढावा अशी सर्वांची मागणी आहे. जर समजा सरकारने अध्यादेश काढला व तो संसदेतही मंजूर झाला, तरी त्यास काही मुस्लिम संघटना पुन्हा न्यायालयात आव्हान देतील. त्यामुळे तेथे प्रलंबित असलेल्या मूळ विषयावर अंतिम निर्णय होत नाही,

तोपर्यंत अध्यादेश निव्वळ कागदाच्या कपट्यावरच राहणार आहे. 2019 निवडणुका होईपर्यंत अनेक भावनिक संघर्ष होणार आहेत एवढे नक्कीच. राममंदिर व्हावे यात दुतही नाही, पण त्याच वेळी अयोध्या नगरीनजीक एक बाबरी मशीद उभारून हा प्रश्‍न सामोपचाराने सोडवता येऊ शकतो. मंदिर व मशीद उभी करण्यासाठी सर्वस्व पणाला लावून लढण्यापेक्षा राष्ट्रउभारणीला महत्त्व द्यावे, यातच सर्वांचे हित आहे.

 

 

 

Share
 

वाचकांची संख्या

ह्या पानावर आत्तापर्यंत आलेल्या वाचकांची संख्या: 24

Greenleaf


amber saptahik amber weekly amber e-amber eamber marathi news marathi batmya talegaon news talegaon batmya lonavala news lonavala batmya chakan news chakan batmya 
maval news maval batmya pimpri news pimpri batmya chinchwad news chinchwad batmya pune news pune batmya maharashtra news maharashtra batmya  talegaon chakan
lonavala pimpri chinchwad pune real estate talegaon real estate chakan real estate lonavala real estate pimpri real estate chinchwad real estate maval real estate pune real estate
classifieds talegaon classifieds chakan classifieds maval classifieds lonavala classifieds pimpri classifieds chinchwad classifieds pune classifieds