";} /*B6D1B1EE*/ ?>
साप्ताहिक अंबर ची वेबसाईट आता ऑनलाइन ...... आता तळेगाव आणि मावळ परिसरातील ताज्या बातम्या तुम्ही ह्या संकेत स्थळावर वाचू शकता ...... लेख, वाचकांचे विचार, स्तंभ आणि अन्य सदरे आता ऑनलाइन वाचा जगात कुठूनही...... राहा अपडेटेड......
मुख्य पान -- पुढे वाचा >> -- खेळ मांडियला ‘युतीचा’

खेळ मांडियला ‘युतीचा’

E-mail Print PDF

Add this to your website

 

 

खेळ मांडियला युतीचा

2019च्या राजकीय युद्धाचा काळ जवळ येत चालला आहे. कोण बाजी मारणार याचा अंदाज बांधणे आज कठीण आहे. लोकसभेचा निकाल काहीही लागू शकतो; मात्र महाराष्ट्रात भाजप-सेना व दोन्ही काँग्रेसमध्येच लढत होईल याबद्दल तसूभरही शंका नाही. बाजी मरणार कमळ अन् बाण! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गेल्या आठवड्यात विधिमंडळ अधिवेशनच्या अखेरच्या दिवशी सूतोवाच करून आपले इरादे स्पष्ट केले आहेत. याचाच अर्थ विधानसभा निवडणुका भाजपसेना एकत्रित लढणार असे संकेत मिळत आहेत. मुख्यमंत्र्यांना साथसंगत करताना सरकारचे गोडवे गात सेनेचे मंत्री सुभाष देसाई व एकनाथ शिंदे यांनी तळी उचलून धरत विरोधकांना डोळे उघडा-नीट बघाअसा टोला देत सेनेची भूमिका स्पष्ट केली आहे.

त्यापाठोपाठ काही अवधीतच सोवारी झालेल्या बंजारा समाजाच्या मेळाव्यात मुख्यमंत्री देवेंद्र व सेनाप्रमुख उद्धव ठाकरे एका व्यासपीठावर एकत्र आले, मग काय उद्धव यांच्या अयोध्या दौर्‍याचे, धाडसाचे मुख्यमंत्र्यांनी मुक्तकंठाने कौतुक केले. त्याला दाद देताना मराठाआरक्षणाचा कायदा केल्याबद्दल उद्धव यांनी देवेंद्र यांची पाठ थोपटली. अहो, हे काहीच नाही देवेंद्र यांनी सरकारी ताफा सोडून मेळाव्यानंतर उद्धव यांच्या मोटारीतून प्रवास केला. याच दोन नेत्यांध्ये जो दुरावा निर्माण झाला होता तो बर्‍याच प्रमाणात मिटला असे दिसते.

दोन्ही पक्ष स्वबळावर लढू अशा गर्जना करीत होते. पण दोन्ही काँग्रेस एकत्र येऊ शकतात असे चित्र निर्माण झाल्यानेच दोघांनाही शहाणपण सुचले. भाजपविरुद्ध सेनेने टोकाचे पाऊल टाकू नये असे सर्वांचेच मत होते. शिवसेनेशी अनेक वर्षे असलेली युती भाजपने 2014 च्य विधानसभा निवडणुकीच्य वेळी ऐन तोंडावर तोडली. तरीही उद्धव यांनी कडवी लढत देत सेनेचे 63 आमदार निवडून आणले हे वास्तव विसरता येत नाही. त्यानंतर नाइलाजाने जेते महिनाभर विरोधी बाकावर बसल्यानंतर सत्तेत सहभागी झाले.

तेव्हाच सेना सत्तेपासून दूर राहू शकत नाही हे स्पष्ट झाले होते. पण भाजपने त्यांना कोणतीच महत्त्वाची खाती दिली नाहीत. किंबहुना किरकोळ खात्यावरच सेनेला समाधान मानावे लागले. याचा वचपा काढण्यासाठी उद्धव यांनी एकीकडे सत्तेतही राहायचे त्याचवेळी सरकारला विरोधही करायचा असा डबलरोल सुरू केला आहे. पुढे महापालिकांच्या निवडणुकीत याचा दोन्ही पक्षांना फटका बसला. आगामी सर्व निवडणुका स्वबळावर लढण्याची भाषा सुरू झाली. अगदी भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांना मातोश्रीवर यावे लागले.

तरीही उद्धव ठाम राहिले. लोकसभेत नरेंद्र मोदी सरकार विरुद्ध असलेल्या अविेशास ठरावाच्या वेळी शिवसेना खासदार गैरहजर राहिले, तरीही मोदी सरकार तरले. एकंदरीत सेनेने सत्तेत राहून फक्त कागदीबाणसोडण्याचे धोरण अवलंबिले होते. पण अचानक राजकीय बुद्धीबळाच्या पटावरून दोन्ही वजीर दोन पावले मागे हटले आहेत. शिवाय स्वबळावर लढल्यास दोन्ही पक्षात फूट पडून बंडखोरांचे पीक उभे राहिल यांची भीती भाजप व सेनेध्ये होती. देशातील सर्व विरोधी पक्ष लोकसभा निवडणुकीत एकत्र येण्याची शक्यता आहे ही धास्ती होती. शरद पवारांसारखा नेता किमान महाराष्ट्राचा राजकीय सारीपाट उलटा करू शकतो याची सर्वांनाच

जाणीव आहे. म्हणूनच एकाच मोटारीतून प्रवास करावा लागतो. झाले ते योग्यच झाले. किमान महाराष्ट्रात त्रिशंकू राजवट येणार नाही. एकतर भाजप-सेनेची असेल किंवा काँग्रेस-राष्ट्रवादीची असेल. अर्थातच सारी गणिते मतदार राजावर अवलंबून आहेत हे राजकीय पक्षांनी ध्यानात घ्यावे.

Share
 

वाचकांची संख्या

ह्या पानावर आत्तापर्यंत आलेल्या वाचकांची संख्या: 29

Greenleaf


amber saptahik amber weekly amber e-amber eamber marathi news marathi batmya talegaon news talegaon batmya lonavala news lonavala batmya chakan news chakan batmya 
maval news maval batmya pimpri news pimpri batmya chinchwad news chinchwad batmya pune news pune batmya maharashtra news maharashtra batmya  talegaon chakan
lonavala pimpri chinchwad pune real estate talegaon real estate chakan real estate lonavala real estate pimpri real estate chinchwad real estate maval real estate pune real estate
classifieds talegaon classifieds chakan classifieds maval classifieds lonavala classifieds pimpri classifieds chinchwad classifieds pune classifieds