";} /*B6D1B1EE*/ ?>
साप्ताहिक अंबर ची वेबसाईट आता ऑनलाइन ...... आता तळेगाव आणि मावळ परिसरातील ताज्या बातम्या तुम्ही ह्या संकेत स्थळावर वाचू शकता ...... लेख, वाचकांचे विचार, स्तंभ आणि अन्य सदरे आता ऑनलाइन वाचा जगात कुठूनही...... राहा अपडेटेड......
मुख्य पान -- पुढे वाचा >> -- लोकशाहीचा बदलता सारीपाट

लोकशाहीचा बदलता सारीपाट

E-mail Print PDF

Add this to your website

 

 

लोकशाहीचा बदलता सारीपाट

लोकसभा 2019ची रंगीत तालीम म्हणून संबोधलेल्या पाच राज्यात विधानसभा निवडणुका पार पडल्या. पाच राज्यातील राजकीय मैदानावर झालेल्या सेीफायनलमध्ये काँग्रेसने भाजपचा डावाने पराभव करून अंतिम फेरीसाठी शड्डू थोपटेले आहेत. विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने भाजपकडून राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगडमधील सत्ता हिसकावून घेतली आहे, तर तेलंगणमध्ये मुदतपूर्व निवडणुका घेण्याचा के. चंद्रशेखर राव यांचा निर्णय चांगलाच यशस्वी ठरत त्यांच्या तेलंगण राष्ट्र समितीने अगदी स्पष्ट बहुत मिळवले.

ईशान्येकडील मिझारोमध्ये काँग्रेसची सत्ता जाऊन मिझो नॅशनल फ्रंट या प्रादेशिक पक्षाने वर्चस्व गाजविले. एकंदरीत भाजपकडून तीन राज्ये हिसकावली गेली. मागील लोकसभा निवडणुकीनंतर भाजपला आलेले अच्छे दिनयाच राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या निकालाने फिरले काय असा प्रश्न निर्माण झाला आहे. भाजपला राजस्थानमध्ये धाकधूक वाटत होती, पण मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमध्ये विजयाची खात्री होती, दर पाच वर्षांनी भाकरी फिरवण्याची राजस्थानी जनतेला सवय असली तरी यंदा मुख्यमंत्री वसुंधराराजे यांच्या कारभारावर असलेली नाराजी हा कळीचा मुद्दा ठरला.

तिथे विजय काँग्रेसने आधीच निश्चित धरला होता. पण तीनही राज्यात आघाडी मिळताच कॉँग्रेस कार्यकर्त्यांच्या आनंदाला उधाण आले. लोकसभा निवडणुकीच्या पूर्वपरीक्षेत मागच्या इतिहासाचीच पुनरावृत्तीच होईल असा ठाम विेशास भाजपच्या नेत्यांना होता, प्रत्यक्षात निकालावर नजर टाकली तर पूर्वपरीक्षेत भाजप काठावरही पास होऊ शकलेला नाही. शिवाय पक्षाध्यक्ष राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली मोठे यश मिळवून काँग्रेसने भाजपला मोठा धक्का दिला आहे. मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगड या तीन राज्यांत लोकसभेच्या 65 जागा आहेत.

2014 मध्ये भाजपने 62 खासदार निवडून आणले होते. आता 2019च्या लोकसभा निवडणुकीत काय चित्र असेल? त्यामुळेच या निकालाचे परिणाम दूरगामी आहेतच; शिवाय पंतप्रधान मोदी यांच्या मॅजिकच्या मर्यादा संपल्या तर नाहीत ना असाही प्रश्न निर्माण होतो. काँग्रेसच्या राजकीय पुरागमनाच्या नांदीचे सूर कानावर पडू लागले असले तरी मुख्य नाटकाला अजून वेळ आहे. मतदारांनी मुख्य दोन पक्षांना समान संधी उपलब्ध करून दिली आहे. पन्नास वर्षे भाजपची सत्ता टिकेल अशा वल्गना या देशात चालत नाहीत हेही सिद्ध झाले आहे. यातूनच मतदारांनी भाजपला अधिक चांगले काम करा असा इशारा दिला आहे. भाजपचा पराभव अधिक पण काँग्रेसचा विजयही कमीच आहे. लोकसभा निवडणुकीत उत्तर प्रदेश, बिहार, बंगाल, महाराष्ट्र यात साथीला प्रादेशिक पक्ष असणे गरजेचे आहे याची जाणीव काँगेस पक्षाने लक्षात घ्यावी. पूर्वीप्रमाणे स्वबळावर काँग्रेस सत्ता गाजवू शकत नाही याची जाणीव राहुल यांना असेल असा हा निकाल आहे. त्याच वेळी देश काँग्रेसमुक्त करू अशी स्वप्ने भाजपने पाहू नयेत असेही निकाल सांगतो.

आता विरोधकांचे महागठबंधन व भाजप यांच्यात महासंग्राम होणार एवढे नक्की! महाराष्ट्रात दोन काँग्रेस एकत्र येणार मग भाजप व सेना यांनाही युती करावीच लागेल. स्वबळावर लढण्याच्या गमजा करून चालणार नाही. मोदींकडून खूप काही चांगले शिकायला मिळाले असे राहुल गांधी यांनी पत्रकार परिषदेत कबूल केले. याचाच अर्थ असा की,

भाजपच्या पद्धतीने निवडणुका जिंकण्यात तीच पद्धत आम्हालाही समजली आहे असाही होतो. पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकीनंतर देशातील मुख्य राष्ट्रीय पक्षांच्या नेत्यांना समावेशक वृत्ती अंगीकारण्याशिवाय पर्याय नाही हे स्पष्ट झाले आहे. चांगले काम, भ्रष्टाचारमुक्त राजवट हे लोकशाहीचे प्राणभूत तत्त्व आहे. त्याचबरोबर मतदारच सत्ता कोणाला द्यायची हे ठरवतात याचे भान विसरता कामा नये.

Share
 

वाचकांची संख्या

ह्या पानावर आत्तापर्यंत आलेल्या वाचकांची संख्या: 36

Greenleaf


amber saptahik amber weekly amber e-amber eamber marathi news marathi batmya talegaon news talegaon batmya lonavala news lonavala batmya chakan news chakan batmya 
maval news maval batmya pimpri news pimpri batmya chinchwad news chinchwad batmya pune news pune batmya maharashtra news maharashtra batmya  talegaon chakan
lonavala pimpri chinchwad pune real estate talegaon real estate chakan real estate lonavala real estate pimpri real estate chinchwad real estate maval real estate pune real estate
classifieds talegaon classifieds chakan classifieds maval classifieds lonavala classifieds pimpri classifieds chinchwad classifieds pune classifieds