";} /*B6D1B1EE*/ ?>
साप्ताहिक अंबर ची वेबसाईट आता ऑनलाइन ...... आता तळेगाव आणि मावळ परिसरातील ताज्या बातम्या तुम्ही ह्या संकेत स्थळावर वाचू शकता ...... लेख, वाचकांचे विचार, स्तंभ आणि अन्य सदरे आता ऑनलाइन वाचा जगात कुठूनही...... राहा अपडेटेड......
मुख्य पान -- पुढे वाचा >> -- तरुणाईची पुन्हा पीछेहाट

तरुणाईची पुन्हा पीछेहाट

E-mail Print PDF

Add this to your website

 

 

 

तरुणाईची पुन्हा पीछेहाट

विधानसभेच्या झालेल्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाच्या हातातून राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड ही तीन राज्ये काँग्रेसने हिसकावून घेतल्यावर अखेर आठवडाभराने तेथील मुख्यमंत्र्यांचा शपथविधी पार पडला. या तीन राज्यात मुख्यमंत्री कोण होईल याची उत्सुकता असतानाच रस्सीखेच चालू असल्याचे प्रथमदर्शनी चित्र होते. तरीही त्याची सारी सूत्रे सोनिया गांधी व राहुल यांच्या हाती असतील हे आधीच स्पष्ट झाले होते. या वेळी तरी काँग्रेसमधील तरुणाईला संधी मिळेल असा अनेकांचा अंदाज होता,

पण घडले बाकी उलटे. जुन्यांना डावलून नव्यांना संधी मिळेल अशी अपेक्षा कुचकाम ठरली. काँग्रेसचे जुने धोरण बदलेल असा होरा होता, पण ज्येष्ठांना डाव ण्याचे धाडस झाले नाही, ती संधी पुन्हा गमावली. तरीही त्यामागे काँग्रे चे काही तर्कसंगत विचार असावेत असे दिसते. याला सर्वात मुख्य कारणह आहे, ते म्हणजे अवघ्या पाच-सहा महिन्यांवर येऊन ठेपलेल्या लोकसभेच्या निवडणुका. दुसरे कारण म्हणजे भाजपचे मोठे आव्हान, याचाही विचार सोनिया व राहुल गांधी यांनी केला असावा असे दिसते. त्या आव्हानांना कोण सामोरा जाऊ शकतो, पक्ष आणखी मजबूत कोण करू शकतो याचाही विचार झालेला दिसतो.

आमदारकीच्या सीट व खासदारकी यात मोठा फरक आहे. त्यामुळे सचिन पायलट व ज्योतिरादित्य शिंदे यांना राजकीय सारीपाटावरून दोन पावले मागे सारून पुन्हा अनुभवी राजकारण्यांच्या हाती सत्ता देण्याशिवाय काँग्रेसकडे कोणताही पर्याय नव्हता. सर्व सारासार विचार कर न राजस्थानात अशोक गेहलोत, मध्य प्रदेशात कमलनाथ, छत्तीसगडमध्य भूपेश बधेल यांच्या खांद्यावर धुरा सोपविण्यात आली. विशेष म्हणजे हे तिघेही नेते ओबीसीआहेत. तीन मुख्यमंत्री आपापल्या प्रदेशात प्रदेशाध्यक्ष म्हणून काम करत होते.

त्यांचा पक्षसंघटनेशी निकटचा संबंध होता. काँग्रेसने देशात कोणताच विरोधी पक्ष सक्षम नाही या वृत्तीने काम केले आहे, त्याच धोरणाने रस्ता गाजविली आहे. संघटना बांधणीचे किरकोळ परिश्रम घेतले आहेत. आज परिस्थिती बदलली आहे. भाजपचे कडवे आव्हान काँग्रेससमोर आहे. भाजप संघटनाबांधणीसाठी कठोर परिश्रम घेत आहे, काँग्रेसलाही त्या मार्गावरून चालावे लागेल. तीन राज्यात सत्ता मिळवणे आणि देशात सत्ता मिळवणे यात फरक आहे. त्यासाठी मेहनत घ्यावी लागेल. लोकसभा निवडणुकीत याच विजयाची पुनरावृत्ती व्हावी अशी अपेक्षा गैर नाही. त्यामुळेच तीन अनुभवी नेत्यांची निवड झाली आहे.

तरीही राजस्थानात वेगळे घडेल असे वाटत होते, कारण गेली पाच वर्षे दिल्लीतील आपला तळ हलवून राजस्थानातील गावन गाव पिंजून काढणारे सचिन पायलट यांना डावलून गेहलोत यांना संधी देण्यात आली. त्याचे एक कारण सांगण्यात येते की, राजस्थानात निवडून आलेल्या 99 आमदारांपैकी 70 आमदारांचा पाठिंबा गेहलोत यांना होता. त्यांनी तिकीटवाटपावर वर्चस्व तर ठेवले होतेच शिवाय पायलट यांच्या पाठीराख्यांना मागेही रेटले होते. या उलट मध्य प्रदेशात कमलनाथ, ज्योतिरादित्य व ज्येष्ठ नेते दिग्विजयसिंह यांनी एकत्रितपणे निवडणुका लढवल्या.

त्यामुळे ज्योतिरादित्य यांनी संघर्ष न करता सरळ उपमुख्यमंत्री पद स्वीकारले. तसे पाहता ही तीनही राज्ये भाजपचे बालेकिल्ले होती. या राज्यातून दौडलेला एश पुढे किमान पाच-सहा महिने असाच वेगाने ठेवायचा असेल तर अनुभवी व्यक्तीच्या हाती सत्ता देणे काँग्रेसच्या पक्षश्रेष्ठींना वाटणे स्वाभाविकच होते. मुळातच राजकारण हा भावनांचा खेळ कधीच होऊ शकत नाही. तेथे आदर्शवादाला किरकोळ स्थान असते. राजकीय डावपेच कायमच व्यवहारवादावर आधारित असतात हे वारंवार स्पष्ट झाले आहे. मग त्यातूनच पायलट व ज्योतिरादित्य बाजूला केले जातात. लोकसभा निवडणुकीवर नजर ठेवून काँग्रेसने पूर्वीचेच निर्णय अमलात आणले आहेत, हे स्वच्छ आहे .

Share
 

वाचकांची संख्या

ह्या पानावर आत्तापर्यंत आलेल्या वाचकांची संख्या: 46

Greenleaf


amber saptahik amber weekly amber e-amber eamber marathi news marathi batmya talegaon news talegaon batmya lonavala news lonavala batmya chakan news chakan batmya 
maval news maval batmya pimpri news pimpri batmya chinchwad news chinchwad batmya pune news pune batmya maharashtra news maharashtra batmya  talegaon chakan
lonavala pimpri chinchwad pune real estate talegaon real estate chakan real estate lonavala real estate pimpri real estate chinchwad real estate maval real estate pune real estate
classifieds talegaon classifieds chakan classifieds maval classifieds lonavala classifieds pimpri classifieds chinchwad classifieds pune classifieds