";} /*B6D1B1EE*/ ?>
साप्ताहिक अंबर ची वेबसाईट आता ऑनलाइन ...... आता तळेगाव आणि मावळ परिसरातील ताज्या बातम्या तुम्ही ह्या संकेत स्थळावर वाचू शकता ...... लेख, वाचकांचे विचार, स्तंभ आणि अन्य सदरे आता ऑनलाइन वाचा जगात कुठूनही...... राहा अपडेटेड......
मुख्य पान -- पुढे वाचा >> -- साखरेचा समुद्र

साखरेचा समुद्र

E-mail Print PDF

Add this to your website

 

साखरेचा समुद्र

साखरेचे खाणार त्याला देव देणार’, अशी आपल्याकडे म्हण आहे, पण आमचे नितीनभाऊ गडकरी काही वेगळेच सांगण्याचा प्रयत्न करीत आहेत. सातारा व सांगली जिल्ह्यातील विविध सिंचन योजनांच्या व राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या कामांचे भूमिपूजन नितीनभाऊ व नानासाहेब ऊर्फ फडणवीस यांच्या हस्ते झाले. त्यावेळी भाऊ म्हणाले की, यापुढे राज्यात एकाही साखर कारखान्याला परवानगी देऊ नका. सिंचन योजनेवर ऊस पिकविणे थांबवा; अन्यथा साखर समुद्रात बुडवावी लागेल. मग उसाचे व साखरेचे करायचे तरी काय?

यावर भाऊ म्हणतात थेट इथेनॉल निर्मितीच्या प्रकल्पांना मंजुरी द्या. यावर आम्ही बुचकळ्यात पडलो. साखर नाही मग प्रभाती चहापान कसे करायचे, की समुद्रात चहापावडर टाकून कपभर चहा प्राशन करायचा असा पेच पडला, पण काहीसा विचार केल्यावर नितीनभाऊ रास्त बोलले असा विचार मनात आला. मुळातच भाऊ हे परखड व व स्पष्टवक्तेपणाबद्दल ओळखले जातात. त्यामुळे कुशल डॉक्टरांप्रमाणे त्यांनी साखर उद्योगाचे निदान केले आहे. त्यावर उपाय म्हणून राज्यात नवीन साखर कारखाने नकोत असे भाष्य केले आहे. महाराष्ट्रात गेल्या तीस वर्षांपासून एकाच प्रकारचे आणि एका पिकावरचे कृषी प्रक्रिया मॉडेलम्हणून ऊस पिकाकडे पाहिले जात आहे. त्याचा हा फटका असल्याचे प्रथमदर्शनी दिसते.

अतिसाखर आरोग्याला जशी मारक तसेच तिचे अती उत्पादनही अर्थव्यवस्थेला घातक आहे. ऊस कारखाने कमी पर्जन्यमान असणार्‍या भागातून हलवावेत व त्याठिकाणी ऊस लागवडीवर बंधने आणावीत अशा सूचना कृषितज्ज्ञांनी यापूर्वीच केल्या आहेत. याशिवाय हे ज्यांनी ऐकायचे त्या बळीराजाला उसाव्यतिरिक्त पर्याय देणार कोण, या प्रश्नाचे उत्तर जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत ऊसचक्रचालूच राहील असे दिसते. राज्याच्या कृषी अर्थव्यवस्थेत उसाला अत्यंत महत्त्व आहे, महाराष्ट्र साखर उत्पादनात अग्रेसर आहे. हे सारे कौतुकास्पद असले तरी धोक्याची घंटा नितीनभाऊंनी वाजवली आहे एवढे मात्र मान्य करावे लागेल.

इतर कोणत्याही पिकाला भाव मिळत नाही. त्यामुळे शेतकरी उसाच्या लागवडीला पसंती देतात, कारण सरकारी संरक्षण उसाला अधिक आहे. शिवाय शेतकर्‍यांना उसाचे पैसे मिळाले नाही तर फौजदारी कारवाईची तरतूद आहे. अन्य पिकात हे लाभ नाहीत असे मुख्य कारण पुढे येत आहे. साखर उद्योगात जवळपास शंभर कारखाने राजकीय लोकांकडे आहेत, इतर कारखानेसुद्धा त्यांच्या नात्यागोत्यातील अथवा मित्रमंडळीचे आहेत. त्यामुळे या उद्योगाला सोयीची धोरणे पूर्वीपासूनच सरकारने कालानुरूप ठरवली आहेत.

मात्र या उद्योगाला मिळालेली अतिमोकळीक धोकादायक ठरत आहे. कारखानदारांना काही कारणाने उसाचे पैसे देणे शक्य झाले नाही तर पॅकेज’ - सरकारी तिजोरीतून पैसे देण्याची व्यवस्था आहे. त्यामुळे पहावे तिकडे ऊस अणि कारखाने उदंड झाले आहेत. अन्य पिकांना कोणी वाली राहिला नाही, कारण काहीही हमी राहिली नाही. टोॅटो, फ्लॉवर, कांदा यासारखी पिके कधीकधी रस्त्यावर फेकून द्यावी लागतात. पुढील वर्षी पुरेल एवढी साखर देशात तयार झाली आहे. देशात साखरेची गरज 260 लाख टन आहे.

गेल्या वर्षाची 107 लाख टन आणि यंदा उत्पादित होणारे 325 लाख टन साखर पाहता 432 लाख टन साठा होणार आहे. सरकारने साखर कृषी धोरण बदलून आता इतर पिकांकडे लक्ष देण्याची वेळ आली आहे, हेच नितीन गडकरी यांनी सुचविले आहे. तसेच साखरेनंतर उसापासून इथेनॉल तयार करण्याबाबत तज्ज्ञांच्या शंकांचा सामना करायचा आहे. त्यामुळेच ऊस व साखरकारखाने या धोरणांचा फेरविचार करण्याची गरज आहे. यासाठी अन्य सर्व पिकांचा शाश्‍वत पर्याय शेतकर्‍यांना उपलब्ध करून द्यावा लागणार आहे. साखर तर आम्हाला गरजेपुरती हवीच आहे, यात दुत नाही. त्याचबरोबर अन्य पिकांचे उत्पादनही व्हावे, याची जाणीव ठेवून सरकारने कृषी प्रकल्पासाठी विभागवार धोरणे अमलात आणण्याची गरज आहे. शेवटी बळीराजा हा खर्‍या अर्थाने राष्ट्राचा अन्नपुरवठामंत्री आहे हे कोणीही विसरू नये.

Share
 

वाचकांची संख्या

ह्या पानावर आत्तापर्यंत आलेल्या वाचकांची संख्या: 49

Greenleaf


amber saptahik amber weekly amber e-amber eamber marathi news marathi batmya talegaon news talegaon batmya lonavala news lonavala batmya chakan news chakan batmya 
maval news maval batmya pimpri news pimpri batmya chinchwad news chinchwad batmya pune news pune batmya maharashtra news maharashtra batmya  talegaon chakan
lonavala pimpri chinchwad pune real estate talegaon real estate chakan real estate lonavala real estate pimpri real estate chinchwad real estate maval real estate pune real estate
classifieds talegaon classifieds chakan classifieds maval classifieds lonavala classifieds pimpri classifieds chinchwad classifieds pune classifieds