";} /*B6D1B1EE*/ ?>
साप्ताहिक अंबर ची वेबसाईट आता ऑनलाइन ...... आता तळेगाव आणि मावळ परिसरातील ताज्या बातम्या तुम्ही ह्या संकेत स्थळावर वाचू शकता ...... लेख, वाचकांचे विचार, स्तंभ आणि अन्य सदरे आता ऑनलाइन वाचा जगात कुठूनही...... राहा अपडेटेड......
मुख्य पान -- पुढे वाचा >> -- जाहली भली पहाट

जाहली भली पहाट

E-mail Print PDF

Add this to your website

 

 

जाहली भली पहाट

जगभर सरत्या वर्षाला निरोप देऊन नव्या वर्षाचे स्वागत झाले आहे. पाश्चिमात्य राष्ट्रात ही पद्धत खूप पूर्वीपासून रूढ होती, पण आपल्याकडे मात्र साधारण पंचवीस-तीस वर्षांपासून याचे वाजवीपेक्षा जास्त अवडंबर होत आहे. अगदी पूर्वी भिंतीवरील कॅलेंडर बदलले की, नवीन वर्ष सुरू झाले याची जाणीव व्हायची; पण आता बाकी 31 डिसेंबरला रात्री झिंगझिंग - झिंगाटकेल्याशिवाय नवे वर्ष चालूच होत नाही. तसं म्हटलं तर 31 डिसेंबर व 1 जानेवारीचा सूर्य तोच तर असतो, त्यात काहीही फरक नसतो.

त्यामुळे नववर्ष न म्हणता फार तर पुढचं वर्ष म्हणता येईल, पण उमेद नवी असते. ती जागृत करण्यासाठी नववर्ष हे आपण शोधलेले एक सुंदर निमित्त आहे. नव्या वर्षात नव्या उमेदीत अनेकजण नवे संकल्प, काही चांगली धोरणे राबवण्याचे ठरवतात. पण तडीस नेणारे हाताच्या बोटावरच असतात. चाललंय ते ठीक आहे, आपण पुष्कळ ठरवतो पण व्हायच्या त्या गोष्टी नकळत घडत जातात व संकल्प आपोआप मोडतो. 31 डिसेंबर तुम्हाला घरातही साजरा करता येऊ शकतो. त्या रात्री सर्व ठिकाणी स्थानिक प्रशासन,

पोलीस यंत्रणा यांना आधीपासून सज्ज व्हावे लागते. हॉटेल, रिसॉर्ट, पर्यटनस्थळ, रस्त्यावर उतरून धांगडधिंगा करण्याची काहीही गरज नसते, पण चंगळवादी संस्कृती अलीकडे गुटगुटीत होत चालली आहे. शहरात असलेली ही संस्कृती आता ग्रामीण भागातील फार्महाऊस आणि शेताच्या बांधावरही खिदळू लागली आहे.

टेबलवर ओसडून जाणारे अन्नपदार्थ टाकून दिले जातात. त्याच वेळी एखाद्या गावपाड्यावर थंडीत कुडकुडत उपाशीपोटी अनेकजण झोपेची प्रतीक्षा करत असतात. मौज जरूर करा, पण ज्या सामाजिक संस्था समाजातील वंचितांसाठी झटत आहेत त्यांना वर्षातून एकदा आर्थिक मदतीचा हात द्या; इतका मामुली संकल्प तुम्हाला नक्कीच जड जाणार नाही. हे सारे भाष्य झाले आम आदमीसाठी;

मात्र आता भारतीय राजकारणात 2019 साली महाभारतघडणार आहे. लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुका, महाराष्ट्रासह अन्य राज्यांत विधानसभा निवडणुका होणार आहेत. भाजपचा एशमेध वारू 2018च्या अखेरीस पाच राज्यात रोखला गेला. याच सरत्या सालाने देशातील शेतकरी रस्त्यावर उतरलेला पाहिला. मराठा आरक्षणासाठी मोर्चांची जागतिक नोंद झाली. त्याचबरोबर रोजगाराच्या शोधात वणवण करणारे तरुणांचे तांडेही पाहिले. त्यामुळेच हे सर्वजण काय करतात यावर देशाचे राजकीय भवितव्य असेल.

दुष्काळ हे सरकारसमोरचे मोठे आव्हान आहे; आणि विरोधक कितीही गमजामारत असले तरी ते सर्वजण निसर्गापुढे हतबद्ध आहेत हे त्यांना मान्य करावेच लागेल. यंदा पाणी समस्या दिवसेन् दिवस कठीण होत जाणार आहे. पाऊस पडायला आणखी सहा महिने अवकाश आहे. तुम्ही पाणी आणणार कोठून? की धरणात पुन्हा पूर्वीसारखा कार्यक्रमकरणार. मंदिर, मशिद, रामरक्षा, नमाज किंवा चर्चध्ये कितीही प्रार्थना केल्या तरी कोणतीही धर्मसंस्कृती निसर्गाला थोपवू शकत नाही याचे सर्वांनी भान ठेवायला हवे. त्याच वेळी 2019 साली देशाच्या राजकारणात काय घडेल यावर भारतीयांचे भवितव्य अवलंबून आहे. सर्व विरोधी राजकीय पक्षांचे महागठबंधन व भाजप असा हा राजकीय लढा होणार आहे. तरुणाईची यातील भूमिका अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे.

कारण देशातील 60 टक्के नागरिक 40 वर्षांच्या आतील आहेत. गेल्या साडेचार वर्षांच्या कारकिर्दीत मोदी सरकारने काही धाडसी निर्णय घेतले आहेत. जसा फायदा झाला तसाच तोटाही झाला, असे रिर्झव्ह बँक नमूद करते. भाजपची झालेली कोंडी पाहून विरोधकही आपली पोळी भाजून घेत आहेत, तर महाराष्ट्रात शिवसेना सत्तेत असूनही विरोधी पक्षाची भूमिका कायम ठेवत आहे. एकंदरीत सर्व विचार करता भारतीय नागरिकांसाठी नवे वर्ष अत्यंत धोकादायक पद्धतीने अवतरले आहे यात शंका नाही. 31 डिसेंबर छान झाला असेल, पण 2019 साल तुम्हाला लोकशाहीच्या महा-उत्सवालारस्त्यावर ओढणारे असेल. तेव्हा सावध व्हा, घरात बसू नका, रस्त्यावर उतरण्यासाठी आतापासूनच सज्ज व्हा. अखेर साप्ताहिक अंबरच्या सर्व वाचकांना, जाहिरातदारांना, हितचिंतकांना नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!

Share
 

वाचकांची संख्या

ह्या पानावर आत्तापर्यंत आलेल्या वाचकांची संख्या: 52

Greenleaf


amber saptahik amber weekly amber e-amber eamber marathi news marathi batmya talegaon news talegaon batmya lonavala news lonavala batmya chakan news chakan batmya 
maval news maval batmya pimpri news pimpri batmya chinchwad news chinchwad batmya pune news pune batmya maharashtra news maharashtra batmya  talegaon chakan
lonavala pimpri chinchwad pune real estate talegaon real estate chakan real estate lonavala real estate pimpri real estate chinchwad real estate maval real estate pune real estate
classifieds talegaon classifieds chakan classifieds maval classifieds lonavala classifieds pimpri classifieds chinchwad classifieds pune classifieds