";} /*B6D1B1EE*/ ?>
साप्ताहिक अंबर ची वेबसाईट आता ऑनलाइन ...... आता तळेगाव आणि मावळ परिसरातील ताज्या बातम्या तुम्ही ह्या संकेत स्थळावर वाचू शकता ...... लेख, वाचकांचे विचार, स्तंभ आणि अन्य सदरे आता ऑनलाइन वाचा जगात कुठूनही...... राहा अपडेटेड......
मुख्य पान -- पुढे वाचा >> -- द्रोणाचार्यांची एक्झीट

द्रोणाचार्यांची एक्झीट

E-mail Print PDF

Add this to your website

 

 

 

द्रोणाचार्यांची एक्झीट

जगातील सर्वात लोकप्रिय खेळ म्हणजे फूटबॉल, पण अवघे अकरा देशच खेळत असलेल्या क्रिकेट खेळानेही जगभर रसिक तयार केले आहेत. आजमितीला भारतीय क्रिकेटपट्टूंनी सर्वत्र दरारा निर्माण केला आहे. त्याचे बरेच श्रेय द्रोणाचार्यऊर्फ रमाकांत आचरेकर सरांना जाते. नवीन वर्षाच्या प्रारंभी ते अनंतात विलीन झाले. मुंबई क्रिकेटची खाण असलेल्या शिवाजीपार्क मैदानाला त्यांनी गुरुकुलबनविले. त्या आखाड्यात त्यांनी सचिन तेंडुलकरसारखा अनमोल हिरा निर्माण केला. त्याच्या जोडील विनोदकांबळी,

अजित आगरकर, प्रवीण अमरे, रमेश पोवार, चंद्रकांत पंडित, बलविंदर संधू, सुलक्षण कुलकर्णी, समीर द घे, पारस म्हांबरे, लालचंद राजपूत असे आंतरराष्ट्रीय कीर्तीचे खेळाडू, तर प्रथम श्रेणी खेळातील नरेश चुरी, पांडुरंग साळगावकर, अमित दाणी, विनायक सामंत, किरण पोवार, ओंकार खानविलकर, संदेश कवळे, राजा अधटराव, मनोज जोगळेकर, मयूर कद्रेकर, नितीन खाडे, लक्ष्मण चव्हाण, विशाल जैन, श्रेयस खानविलकर आदीसारखे असंख्य खेळाडू त्यांच्या तालमीत तयार झाले. सरांचा जन्म मालवणमध्ये 1932 मध्ये झाला. मुंबईत स्थाईक झाल्यावर न्यू हिंद स्पोटर्स क्लब, झोराष्ट्रीय क्लब व महाराष्ट्र इलेव्हन असे क्लब स्थापन केले.

अनेक महारथी खेळाडू घडविणारे आचरेकर सर बाकी एकच प्रथम श्रेणीचा सामना खेळले होते. तरीही एवढी प्रचंड ऊर्जा त्यांच्यात आली कोठून याचे नवल वाटते. त्यांच्या कार्याची दखल घेऊन 1990मध्ये राज्य शासनाने द्रोणाचार्यआणि 2010 मध्ये पद्मश्रीपुरस्काराने गौरवले. त्यांचा पट्टशिष्य असलेल्या सचिन तेंडुलकरने तर आश्चर्यजनक कामगिरी केली आहे. शतकांचे शतकहा चमत्कार करून ठेवला आहे. कसोटी क्रिकेटमध्ये 49 शतके व वन डेक्रिकेटमध्ये 51 शतके असा विक्रम केला, तो आचरेकर सरांच्या मार्गदर्शनामुळेच. आज भारतीय संघात कर्णधार विराट कोहली व चेतेेशर पुजारासारखे मातब्बर फलंदाज आहेत.

त्यांनाही लांब राहून खेळात काय सुधारणा कराव्या लागतील याचे धडे सर देत होते. क्रिकेटचे चक्रवर्ती महासम्राट असलेल्या ऑस्ट्रेलियाच्या डॉन ब्रॅडमन यांनी सचिनला भेटण्यासाठी बोलावून घेतले होते, त्या वेळी तुझे गुरू महान आहेतअशी आचरेकरांची स्तुती केली होती, याची सार्‍या जगाने दखल घेतली. आचरेकर सरांची प्रशिक्षणाची पद्धत फार वेगळी होती. त्यांचा भर सरावा इतकाच सामने खेळण्यावर होता. आपल्या शिष्यांनी भरपूर सामने खेळावेत यासाठी धडपड करायचे. सचिनला तर ते एका दिवसात दोन-दोन सराव सामन्यात फलंदाजी करायला भाग पाडायचे. म्हणूनच सचिनच्या हातून पराक्रम घडला. शिवाजी पार्कचे मैदान किती मोठे आहे,

हे आपण सर्व जाणतोच. एकाच वेळी त्या मैदानात किती नेट लावली जातात, किती क्लबचा सराव चालू असतो, हे सांगणे कठीण आहे. प्रत्येक नेटकरिता खेळपट्टी तयार करणे मैदानावरच्या कर्मचार्‍यांकरिता जिकिरीचे काम आहे, ते लोक (माळीबुवा) करत असलेले कष्ट आचरेकरांच्या नजरेतून सुटले नव्हते. ते अचानक एखाद्या दिवशी भरपूर अल्पोपाहार घेऊन मैदानात यायचे, सर्व माळीबुवांची यथेच्छ पोटपूजा करायचे. खेळाडूंना ते सांगत,

तुच्या जडणघडणीत माळीबुवांचा मोठा वाटा आहे, तेव्हा त्यांचा मानसन्मान ठेवा. त्यांच्या शिकवणीमुळेच सचिन माळीबुवांच्या मुला-मुलींच्या लग्नात हमखास हजेरी लावतो. त्यांना आर्थिक मदतही करतो. वृद्धापकाळात सरांनी मैदानात येणे कमी केल्यावर त्यांचे नेट शिष्य नरेश चुरीनं सांभाळले. नरेश स्वत: रेल्वे संघाकडून बरीच वर्षे रणजी करंडक स्पर्धा खेळला आहे. आचरेकरांच्या नेहमी तो समीप होता. आजही तो नेटवरून खेळाडूंना खेळातील बारकावे शिकवत आहे. आचरेकरांच्या शेवटच्या वाढदिवसाला त्यांचे सर्व शिष्य गोळा झाले होते.

तेव्हा प्रत्येकजण आपल्याला सरांनी कोणत्या कारणाने धपाटामारला याचा किस्सा सांगत होते. प्रशिक्षक म्हणून केलेल्या संस्कारात स्वत:साठी खेळू नका, तर संघ व देशासाठी खेळा हे पक्के खेळाडूंच्या रक्तात भिनविण्यात ते कमालीचे यशस्वी झाले. आचरेकरांच्या जाण्याने मुंबईचे शिवाजीपार्कवरील गुरुकुलपोरके झाले आहे. या महान द्रोणाचार्यांना सार्‍या भारतीय क्रिकेट रसिकांचा मानाचा मुजरा!

Share
 

वाचकांची संख्या

ह्या पानावर आत्तापर्यंत आलेल्या वाचकांची संख्या: 16

Greenleaf


amber saptahik amber weekly amber e-amber eamber marathi news marathi batmya talegaon news talegaon batmya lonavala news lonavala batmya chakan news chakan batmya 
maval news maval batmya pimpri news pimpri batmya chinchwad news chinchwad batmya pune news pune batmya maharashtra news maharashtra batmya  talegaon chakan
lonavala pimpri chinchwad pune real estate talegaon real estate chakan real estate lonavala real estate pimpri real estate chinchwad real estate maval real estate pune real estate
classifieds talegaon classifieds chakan classifieds maval classifieds lonavala classifieds pimpri classifieds chinchwad classifieds pune classifieds