";} /*B6D1B1EE*/ ?>
साप्ताहिक अंबर ची वेबसाईट आता ऑनलाइन ...... आता तळेगाव आणि मावळ परिसरातील ताज्या बातम्या तुम्ही ह्या संकेत स्थळावर वाचू शकता ...... लेख, वाचकांचे विचार, स्तंभ आणि अन्य सदरे आता ऑनलाइन वाचा जगात कुठूनही...... राहा अपडेटेड......
मुख्य पान -- संपादकीय
अग्रलेख

आता संयमाची गरज

आता संयमाची गरज

महाराष्ट्रात मराठा समाजाचे आंदोलन दीर्घकाळ पेटले आहे. या समाजाला शिक्षण, नोकर्‍या व अन्य बाबतीत आरक्षण हवे आहे. महाराष्ट्रात मराठा समाज मोठा आहे. या समाजाचा मागील सत्तर वर्षांत कधीच विचार झाला नाही. याची त्यांना जाणीव झाल्यानेच हा समाज उसळी मारून आंदोलन करत आहे. एक मराठा लाख मराठाअशी त्यांची आर्त हाक आहे, ती निश्चित योग्य आहे. या समाजात शेतकरी वर्ग अधिक आहे. त्यांचे जीवन काळ्या आईवर अवलंबून असते. निसर्गाने साथ दिली तरच यांचे भवितव्य ठरते.

मात्र निसर्गच कोपला तर सारेच गणित चुकते. मग त्यामुळेच त्यांना कर्ज घेणे क्रमप्राप्त ठरते. शेतीच पिकली नाही तर नाइलाजाने शेतकरी आत्महत्या करतात. राज्यात शेतकर्‍यांच्या आत्महत्यांचे प्रमाण वाढत चालले होते. रोजच अशा घटना घडू लागल्या; त्यातून आंदोलनाचा उद्रेक झाला. समाज एकत्रित झाला; शेतीव्यतिरिक्त आम्हाला आरक्षणाची गरज आहे, असा टाहो फोडू लागला. एखाद्या मागणीसाठी समाज एकत्रित होणे केव्हाही योग्यच; पण त्याचा फायदा उचलून विरोधी राजकीय पक्षांनी त्यावर आपली पोळी भाजून घेता येईल काय याची चाचपणी करून घेणे मात्र तितकेच आयोग्य. ज्यांना सत्तेपासून दूर राहावे लागले असे सर्व संधिसाधूराजकीय नेते या मराठा समाजाला पाठबळ देत आहेत.

जणू काही आम्हीच यांचे कैवारी आहोत असा रोड-शोकरू लागले. अनेक वर्षे महाराष्ट्राची सत्ता तुच्याच हाती होती, तेव्हा काय करत होता तुम्ही? इथे आम्ही आठवण करून देतो की, ए. आर. अंतुले सोडले तर जास्तीत जास्त मुख्यमंत्री मराठा समाजाचे होते आणि आज तीच मंडळी शासनाच्या नावाने शंख करत आहेत. महाराष्ट्राच्या भक्तिमार्गाची वाट असणारी पंढरपूर व आळंदीच्या आषाढी

एकादशीची नुकतीच सांगता झाली; रीही अवघा महाराष्ट्र अस्वस्थ आहे. मुख्य म्हणजे ही खदखद हिंसक मार्गाने व्यक्त होत आहे. मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या मुद्यावरून मलमासचा मुहूर्त साधून एक आंदोलकाने जलसमाधी घेतली, दुसर्‍याने गळफास घेतला, तर तिसर्‍याने विषप्राशन करून जीवन संपविले. त्यामुळे सारा महाराष्ट्र हळहळला. त्यानंतरही हे आंदोलन सुरूच आहे.

या पोर्शभूीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेले आवाहन व निवेदन हे केवळ मराठा समाजाला नव्हे तर अवघ्या महाराष्ट्राला दिलासा देणारे आहे. मराठा समाजाला योग्य न्याय मिळावा म्हणून सरकारने मेगाभरतीस्थगित केली आहे. येत्या नोव्हेंबरअखेर आवश्यक ती सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून मराठा समाजाला आरक्षण देण्यात येईल असे ओशासन दिले आहे. या पोर्शभूीवर रस्त्यावरील आंदोलन रहित करणे सर्वांच्या हिताचे होईल. आंदोलकांनी आपल्या भावनांना आवर घालून राज्यभरातील उद्रेक, प्रक्षोभ थांबवावे, अस विनम्र आवाहन इतर सर्व नागरिकांनी करायला हवे. मुख्यमंत्र्याचे नाव देवेंद्र असले तरी ते साक्षात देव नाहीत. तुच्या- आमच्यासारखाच एक माणूस आहे. ते त्यांच्यापरीने आरक्षणाचा विचार करत आहेत.

मंगळवारी सर्व खासदारांसमवेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन या विषयावर चर्चा केली आहे. आरक्षण मिळू शकते पण काही कायदेशीर बाबींची पूर्तता केल्यावरच. हे ज्ञान विरोधी पक्षांच्या नेत्यांनाही आहे. तरीही तेल ओतण्याचे कसब ते का दाखवतात हे मराठा समाजातील तरुणांनी लक्षात घ्यावे. जीव गमावून, सरकारी मालमत्तेची जाळपोळ करून आपणच आपले नुकसान करत आहोत, असे सांगणारा एखादाही सुज्ञ नेता राज्यात नाही याचा बाकी खेद वाटतो. मराठा समाजाला आरक्षण मिळाले तरी ते पंधरा ते वीस टक्क्यांच्या आसपास असेल. समाज मोठा आहे; बाकीच्यांचे काय? शेतीवर अवलंबून न राहता आता जोडधंदायाचा विचार करावा लागेल. सरकार काहीच प्रतिसाद देत नसेल तर दबाब आणण्यासाठी आंदोलन करणे हा लोकशाहीचा हक्कच आहे.

परंतु मागण्यांबाबत कृती करत असेल तर ताणून धरण्याचे काहीही कारण नाही. ऐन पावसाळ्यात या आंदोलनामुळे शेतीची व अन्य कामे खोळंबली आहेत. त्यातच धनगर व मुस्लिम समाजानेही आरक्षणासाठी उचल घेतली आहे. आंदोलनामुळे राज्यातील जनजीवन विस्कळित झाले तर त्याचा फटका सर्वसामान्यांना बसतो. प्रश्न सुटण्याऐवजी आणखी गुंतागुतीचे आणि तीव्र होत जातात. सततच्या अशांततेने, राज्यात येऊ पाहणारे गुंतवणूकदार दुरावण्याचा धोका आहे. मुख्यमंत्र्यांनी या सर्व बाबींचा लेखाजोगा आपल्या निवेदनात स्पष्ट घेतला आहे. तसे झाल्यास नुकसान हे महाराष्ट्राचे व सर्वांचेच असेल. 9 ऑगस्टचे आंदोलन हे शेवटचे असावे अशी सर्वांचीच अपेक्षा आहे. आता शांततेची आणि संयमाची गरज आहे

पर्यटनातील धोके

पर्यटनातील धोके

दापोली कृषी विद्यापीठातील कर्मचार्‍यांच्या नशिबी शनिवारचा दिवस काळरात्र ठरला. सकाळी मोठ्या उत्साहाने महाबळेेशर येथे सहलीस निघाले, तेव्हा आयुष्याचा हा अंतिम प्रवास असेल याचा जराही विचार त्यांच्या मनात आला नसेल. महाबळेेशर येथे मौज करून नंतर ते राहुरी कृषी विद्यापीठास भेट देणार होते. दरवर्षीप्रमाणे पावसाळ्यातील विरंगुळ्याची सहल होती. मात्र नियतीने त्यांना दोन्ही ठिकाणी जाण्यास प्रतिबंध केला. पोलादपूरहून महाबळेेशरला निघालेली आरामगाडी बस आंबेनळी घाटातील खोल दरीत कोसळली आणि क्षणात बत्तीस जीवांना मृत्यूने गाठले. या अपघाताचे वृत्त ऐकून आणि वाहिन्यांवरील दृश्य पाहून सर्वांच्या काळजात चर्र झाले, अनेक जण हळहळले.

बस 800फूट खोल दरीत कोसळताना त्यातील प्रकाश सावंत एकटेच बाहेर फेकले गेले, एका झाडाचा आधार त्यांना मिळाला. तासाभराने कसेबसे वर आले, त्यानंतर अपघाताची माहिती सर्वांना कळली. हाही एक प्रकारे नियतीचाच खेळ म्हणावा लागेल. अवघ्या महाराष्ट्राला शोकाकुल करणार्‍या भीषण अपघातामुळे सह्याद्रीच्या दर्‍याखोर्‍यातील अनेक बिकट घाटांचा व त्यातील रस्त्यांचा प्रश्न उपस्थित झाला आहे. सह्याद्रीच्या कडेपठारावरून अनेक घाटातून रस्ता पार करावा लागतो. या रस्त्यांवरचा प्रवास जीव मुठीत घेऊन करावा लागतो.

कात्रज, दिवेघाट, माळशेज, खंबाटकी, पोलादपूर, कुंभार्ली, फोंडा सारेच घाट बेलाग आहेत. घाट व त्यातील रस्त्यांची काळजी घेणार्‍या प्रशासकीय यंत्रणेची निष्क्रियता, वाहनचालकांचा निष्काळजीपणा, पर्यटकांची दंगामस्ती अशा विविध कारणांनी असे अपघात घडतात. या अपघातात बस कोसळली तेथे मातीचा ढिगारा होता. पावसामुळे चिखल झाला. त्यातच तीव्र वळणावर चालकाचे नियंत्रण सुटले व बस दरीत गेली, असा प्राथमिक अंदाज आहे. पूर्वी हा घाट रडतोंडीचाघाट म्हणून प्रसिद्ध होता, पण आज हा घाट वाहनचालकांसाठी रडकुंडीचाघाट म्हणून ओळखला जातो. प्रत्येक घाटात वळणावर खोल दर्‍या असतात, त्या ठिकाणी जाड व उंच भिंती उभारणे अवघड नाही.

पण गुडघाभर भिंतीवर प्रश्न संपविला जातो. त्यातच पावसाळा सुरू झाला की दरडी कोसळण्याचा वेगळा धोका असतो. पाऊस व धुके असे घाटातील वातावरण सुखद असले तरी केव्हाही जीवावर बेतणारेच असते, हे अनेक अपघातातून सिद्ध झाले आहे. राज्यातील वाहतूक सुरक्षित होण्यासाठी जे जे उपाय आवश्यक आहेत ते सर्व उपाय तातडीने करण्याची गरज आहे. अलीकडच्या काळात वर्षाविहाराचा आनंद लुटू पाहणार्‍यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. जितकी संततधार तेवढे पर्यटक अधिक असा नवा ट्रेंड रुजू लागला आहे.

महाबळेेशर, लोणावळा, खंडाळा, माथेरान आणि आता तर पवन, नाणे, आंदर मावळाकडे पर्यटकांचे लोंढेच्या लोंढे शनिवार, रविवार आणि जोडून येणार्‍या सुट्टीच्या दिवशी गर्दी करू लागले आहेत. पर्यटकांची वाहने, त्यातून होणारी वाहतूककोंडी, त्यामुळे स्थानिक प्रशासन व पोलीस दलावर येणारा अतिरिक्त ताण आता नित्याचे झाले आहे. डोंगरकड्यावर धोक्याच्या पलीकडे जाऊन सेल्फी काढणे, समुद्रात खोलवर घुसणे, धरणात धोक्याच्या ठिकाणी पोहणे यातून अनेक जणांचे नाहक बळी जातात, पण आंबेनळी घाटात क्षणार्धात एवढे मृत्युुखी पडणे हा अपघात थरकाप उडवणारा आहे.

अशा दुर्घटनेत परिसरातील ट्रेकर्स, स्थानिक तरुण, एनडीआरएफचे जवान प्राणांची बाजी लावून मदतकार्य करताना दिसतात. जीवावर उदार होऊन ते दरीत उतरतात. आताच्या दुर्घटनेत त्यांनी केलेली कामगिरी अंत्यत प्रशंसनीय आहे. या युवकांना योग्य प्रशिक्षण आणि आवश्यक आधुनिक साहित्यसामग्री देण्याची गरज आहे. या दुर्घटनेच्यानिमित्ताने सुरक्षेचे ठोस उपाय योजणे, वाहनचालकांनी घाटातून वाहन जपून चालविणे, पर् टनाच्या नावाखाली हुल्लडबाजी न करणे, जिथे धोकादायक फलक आहेत तेथे दंगामस्ती न करणे आदी विविध बाबींचे पालन केले तर पर्यटनांचा आनंद नक्कीच मिळेल. निसर्ग तुम्हाला खुणावत असतो, त्याचा आस्वाद योग्य रीतीने घ्यावा. शेवटी दापोली कृषी विद्यापीठातील सर्व अभागी कर्मचार्‍यांना भावपूर्वक श्रद्धांजली.

पप्पू की झप्पी

पप्पू की झप्पी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारविरोधात लोकसभेत मांडण्यात

आलेला अविेशास प्रस्ताव चर्चेला येण्याआधीच बारगळणार हे अगदीसूर्यप्रकाशाइतके स्वच्छ होते. हा प्रस्ताव मंजूर होईल व सरकार कोसळेल याचीसूतराम शक्यत नव्हती, आणि घडलेही तसेच. प्रस्तावामागे विरोधकांतील मरगळ दूर करणे आणि त्यांचा आत्मविेशास पुन्हा जागृत करणे एवढाच हेतू होता, हे लपून राहिले नाही. त्याचबरोबर आणखी एक हेतू होता, तो म्हणजे मोदी सरकारच्या चार वर्षांती कारभारावर घाणाघाती हल्ला करण्य चा. विरोधकांचे हेतू सफल झाले असले तरी प्रस्तावाच्या निमित्ताने मोदी यांनीही वर्षभरावर येऊन ठेपलेल्या निवडणुकांच्या प्रचाराचा नारळ लोकसभेतच वाढवून घेतला आणि पुढील रणनीती स्पष्ट करण्याचा उद्देशही साधून घेतला. मोदी विरुद्ध राहुल असे थेट रणशिंग फुकले गेले आहे.

मात्र भाजपने राहुल यांना आजपर्यंत कधीही गांभीर्याने घेतले नाही. पण तरीही त्यांनी सूट बूट की सरकारया एकाच शेर्‍याने मोदी सरकारचे अर्थशास्त्र बदलून टाकले आहे

संसदेत अत्यल्प संख्याबळामुळे काँग्रेसला औपचारि विरोधी पक्षनेतेपदही मिळाले नाही. मात्र त्यांना आता विरोधी पक्षाच्या प्रमुख नेत्याचे स्थान नकळत प्राप्त झाले आहे. त्यामुळेच आगामी निवडणुकीतील मोदीविरोधी आघाडीच्या नेतृत्वपदाचे दावेदार ठरले आहेत. मात्र राहुल यांनी आपली पप्पूप्रतिमा पुसून टाकली आहे काय? आपल्याला कोणी पप्पू म्हटले तरी काही फरक पडत नाही असे ते संसदेत सांगतात. पण ती ओळख पुसली गेल्यास त्यांच्या काँग्रेस पक्षाला नक्कीच आवडेल. राहुल यांना पप्पूधून काढता येईल,

पण पप्पूला त्यांच्यामधून काढता येणार नाही. तसे नसते तर मोदींना बसल्याजागी उभे राहून आलिंगन दिल्यावर संसदेकडे डोळे मिचकावून त्यांनी तारुण्यसुलभ चाळे केले नसते. भाजपने या कृतीवर बालिश व पोरकट अशी टीका केली आहे. व्याख्याने देणार्‍या व ज्ञानामृत पाजणार्‍या भीष्माचार्यांनी भरलेल्या राजकीय विेशात धाडसी किंवा काही प्रमाणात उद्धट प्रकारही व्यक्त होणे नवे नाही.

राजीव यांना पप्पू बनणे हा कदाचित मोठा अडथळा ठरणार नाही. मोदींचा पक्ष म्हणेल की आम्हाला तेच हवे होते. मात्र राहुल यांनी आपला हेतू मांडताना दाखविलेली स्पष्टता व आक्रमकतेुळे भाजपवालेही चक्रावून गेले आहेत. मोदींवर जोरदार हल्ला करताना राहुल यांनी डरो मतअसा पुकारा केला, आणि खाली वाकून त्यांना मिठी मारली. वक्तृत्व आणि हस्तांदोलनात अधिक निपुण असलेल्या ताकदवान प्रतिस्पर्ध्याला त्याच्याच पद्धतीने वरचढ ठरत प्यारकी झप्पीदेऊन मोठी जोखीम पत्करली;

पण त्यामुळे भाजप पुढील निवडणुकीसाठी आतापासूनच सज्ज होईल असे वातावरण तयार झाले आहे. मोदी व राहुल यांच्या लढतीत खरे हसे झाले ते मात्र शिवसेनेचे. या अविेशास ठरावावर नेकी काय भूमिका घ्यायची हे एकीकडे चार वर्षे सत्ता भोगतानाच भाजपवर आसूड ओढणार्‍या शिवसेनेला ठरविताच आले नाही. सेना केंद्रात व राज्यातही सत्तेत सहभागी आहे. त्यामुळे सरकारविरुद्ध हा ठराव त्यांच्याही विरोधात होता, पण सत्ता सोडायची नसल्याने ते कमालीचे गोंधळून गेले. अखेर तलवारी म्यान करून रणांगणातून पोबारा केला. या सार्‍या गोंधळात खरे तर मोदी यांना देशाचे वर्तान व भविष्य याबाबत मार्गदर्शन करण्याची नामी संधी होती. शिवाय सरकारविरोधी आरोप खंडण करण्याची त्यांची वक्तृत्वशैलीही तडफदार आहे. तरीही त्यांनी आकड्याचा खेळ करीत बचाव केला. तर राहुल गांधी यांनी आपल्या पक्षाच्या प्रवृत्ती विरोधात जाऊन कर्नाटकात कनिष्ठ सहकारी असलेल्या धर्मनिरपेक्ष जनता दलास मुख्यमंत्रिपद दिले. त्यामागचे सूत्र म्हणजे,

मोदीव्यतिरिक्त कुणीही चालेल अगदी आपण नसलो तरी चालेल. हेच राजकारण त्यांनी संसदेत राबविताना पुढील निवडणुकीचा भाजपविरोधी हिरो आपणच असणार असे दाखविण्याचा प्रयत्न केला, पण तो दोन दिवसही टिकला नाही. पाटणातील राष्ट्रीय जनता दलाचे नेते तेजस्वी यादव यांनी राहुल हे भाजपविरोधातील एकमेव नेते नाहीत असे गुरुवारी स्पष्ट केले आहे. यासंबंधी विरोधी पक्षांचे सर्व नेते एकत्र येऊन निर्णय करतील असे सूतोवाच केले आहे. 2019च्या निवडणुकीसाठी लठ्ठालठ्ठी चालू झाली आहे. मात्र सर्व गणित मतदारांच्या हाती आहे, हे सर्व पक्षांनी लक्षात ठेवावे.

दूध का दूध

दूध का दूध

अखेर दुधावरून राज्यात सुरू झालेलं आंदोलन शांत झालं. लिटरला किमान 25 रु. भाव देण्याची घोषणा सरकारने केली आणि राजू शेट्टी यांनी चळवळ मागे घेत असल्याचं जाहीर केलं. राज्यातील जनतेला हायसं वाटलं. आज दूध मिळणार का नाही अशी भीती प्रत्येकाच्या मनात होती ती दूर झाली. या आंदोलनादरम्यान पाच दिवसांत राज्यभर जे पडसाद उमटले ते निश्चितच विचार करायला लावणारे असून आंदोलन कशा मार्गाने पुढे जायला हवे याबाबत जनतेच्या मनात काय आहे त्याचा नेत्यांनी विचार करायला हवा, असाच हा विषय आहे.

शेतकरी हा राष्ट्राचा कणा आहे. त्याचा चारही बाजूंनी विचार व्हायलाच हवा. मोदी सरकारने येत्या पाच वर्षात शेतकर्‍याचे उत्पन्नदुप्पट करण्याचा निर्धार वारंवार व्यक्त केला असून त्या दिशेने पावल टाकायला आरंभही केला आहे, हे नुकत्याच जाहीर केलेल्या काही शेतमालाच्या दीडपट हमीभावाच्या निर्णयावरून स्पष्ट झाले आहे.

शेतकरी हा राष्ट्राचा मुख्य घटक असल्यामुळे तो उपेक्षित राहावा असे कोणत्याच सरकारला कधीच वाटणार नाही. प्रश्न असतो पोटतिडीकीने पावले उचलण्याचा. त्या दृष्टीने विचार करता केंद्रातील भाजप सरकारने शेतकर्‍यांच्या संदर्भात अत्यंत स्वागतार्ह धोरणे स्वीकारली आहेत, असे म्हणावे लागेल. याच पद्धतीने वाटचाल पुढे चालू राहिली, तर काही काळात शेतकर्‍यांच्या जीवनात परिवर्तन झाल्यावाचून राहणार नाही.

हा विचार करायला हवा. विविध राजकीय पक्षांच्या भूमिका आता लोकांच्या लक्षात येऊ लागल्या आहेत. नेत्यांना राष्ट्राचे, शेतकर्‍यांचे खरंतर काहीही पडलेले नाही. स्वत:चा मोठेपणा, खुर्ची या गोष्टी सर्वश्रेष्ठ ठरल्या आहेत. येन केन प्रकारेण सत्ता हस्तगत करणे हाच यांच्या अंतरीचा हेतू असल्याचे लोकांना कळू लागले आहे. त्यामुळे यापुढच्या काळात पोटात एक अन् ओठात दुसरेच असणार्‍या मंडळींना सरळ घरची वाट धरावी लागेल,

असे चित्र सुजाण मतदार दाखवून देण्याची शक्यता आहे. खासदार राजू शेट्टी यांना आंदोलन सम्राटया पदवीने गौरवायला हवे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेतृत्व ते करतात. परंतु ज्या हिंसक पद्धतीने आंदोलन चालते ते लोकांना मुळीच आवडत नाही, हे त्यांनी लक्षात घ्यायला हवे. दूध आंदोलनासाठी एस.टी. बसच्या काचा का फोडायच्या? दुधाचे टँकर का फोडायचे? रस्त्यावर दूध ओतून का द्यायचे?

टँकरचे टायर का पेटवायचे? दुसर्‍या राज्यातून टँकर येऊ देणार नाही अशी अरेरावीची भूमिका का घ्यायची? कायदे धाब्यावर का बसवायचे? याचा बरोबर जमाखर्च व्होट बँकेत आता ठेवला जातो आहे. समाज पूर्वीसारखा अडाणी राहिलेला नाही, हे ध्यानात घ्यावे लागेल. हल्ली सरकारला धमक्या देण्याचे प्रमाण वाढू लागले आहे.

मंत्र्यांना जिल्ह्यात फिरकू देणार नाही, मुख्यमंत्र्यांना पंढरपुरात पाय ठेवू देणार नाही, अशा प्रकारच्या उद्दाम भाषा वापरल्या जात आहेत. हे राष्ट्रभक्तीच उदाहरण म्हणावयाचे की खुर्चीचे प्रेम? ही भाषाच सरकारला कळते, सरळ बोलून भागत नाही ही आणखी वर मखलाशी! अशा प्रकारापासून आमची सुटका व्हावी अशीच जनतेची इच्छा आहे. बघू या केव्हा तो दिवस उजाडतो!

Page 6 of 65

वाचकांची संख्या

ह्या पानावर आत्तापर्यंत आलेल्या वाचकांची संख्या: 139

era

little-birdies

amber saptahik amber weekly amber e-amber eamber marathi news marathi batmya talegaon news talegaon batmya lonavala news lonavala batmya chakan news chakan batmya 
maval news maval batmya pimpri news pimpri batmya chinchwad news chinchwad batmya pune news pune batmya maharashtra news maharashtra batmya  talegaon chakan
lonavala pimpri chinchwad pune real estate talegaon real estate chakan real estate lonavala real estate pimpri real estate chinchwad real estate maval real estate pune real estate
classifieds talegaon classifieds chakan classifieds maval classifieds lonavala classifieds pimpri classifieds chinchwad classifieds pune classifieds