";} /*B6D1B1EE*/ ?>
साप्ताहिक अंबर ची वेबसाईट आता ऑनलाइन ...... आता तळेगाव आणि मावळ परिसरातील ताज्या बातम्या तुम्ही ह्या संकेत स्थळावर वाचू शकता ...... लेख, वाचकांचे विचार, स्तंभ आणि अन्य सदरे आता ऑनलाइन वाचा जगात कुठूनही...... राहा अपडेटेड......
मुख्य पान -- संपादकीय
अग्रलेख


अखेर बिगुल वाजले

 

 

अखेर बिगुल वाजले

देशातील सातव्या दशकातील 2019च्या लोकसभा निवडणुकीचा बिगुल दहा मार्चला वाजला. पूर्णपणे स्वायत्ता निवडणूक आयोगाच्या अधीन व देखरेखीखाली नेहमीप्रमाणेच ही निवडणूक होणार आहे. जगातील सर्वात मोठ्या लोकशाहीप्रधान देशातील ही सार्वत्रिक निवडणूक असल्याने संपूर्ण जगाचे लक्ष जून महिन्यापर्यंत भारताकडे लागून राहणार आहे. त्याला कारण म्हणजे अशा निवडणुका फक्त आपल्याकडेच होतात. त्यात शांततेच्या मार्गाने सामान्य मतदारांना देशात कोणत्या राजकीय पक्षाची सत्ता असावी हे ठरविण्याचा एक महत्त्वपूर्ण अधिकार दिला आहे.

स्वातंत्र्यानंतर बरीच वर्षे काँग्रेस पक्षाने सत्ता उपभोगली. बर्‍याच प्रमाणात विकासही केला. परंतु 1999 साली अटलजी आणि 2014 साली मोदी राजवट मतदारांनी नियुक्त केली. मतदारांना आता काहीही शिकवण्याची गरज राहिली नाही. देशाचा गाडा एखाद्या चांगल्या पक्षाकडे व कर्तृत्ववान नेत्याकडे द्यावा एवढा मतदार सुज्ञ झाला आहे. काही ठिकाणी चिरीमिरी घेऊन मतदान होतही असेल, पण आम-आदमी आपल्या मतदारसंघात त्यातल्या त्यात कोण बरा उमेदवार याचा विचारपूर्वक शोध घेऊन मतदान करतो.

थोडक्यात दगडापेक्षा वीट मऊएवढाच त्याचा उद्देश असतो. तर धनदांडग्यांना कोणालाही मतदान करण्याची इच्छा नसते. ते आपल्या कैफ व धुंदीत जीवन जगत असतात. आपल्या लोकशाहीची परंपरा, संकेत, नियम टिकवण्याची जबाबदारी तसेच आचारसंहिता केवळ कागदावरच राहणार नाही याची दखल सर्व राष्ट्रीय पक्षांनी घ्यावी लागेल. राफेल विमान, हॅलिकॉप्टर खरेदी, नोटाबंदी, बेकारी, भ्रष्टाचार, शेतीसमस्या, शेतकर्‍यांच्या आत्महत्या तर दुसरीकडे सरकारची योजनांची खैरात असे प्रश्न जाहीर सभांधून पुढे येणार आहेत.

सर्जिकल स्ट्राईक नं. 2’ हे भाजपचे प्रमुख भांडवल आहे. त्याचा वापर ते करणारच. शिवाय राममंदिरदोघांसाठी कॉन मुद्दा आहे. मंदिर व मशिद यापेक्षा देशाचा विकास, उन्नती, गरिबी कोण हटवणार याला महत्त्व आहे. पण महाभारत युद्धात युधिष्ठरही खोटे बोलला होता, असा आमचा इतिहास आहे. देशाला नेहरू, शास्त्री, इंदिराजी, राजीव, मनमोहनसिंग, अटलजी, मोदी यांसारखे पंतप्रधान लाभले आहेत. यापैकी कुणाकडूनही फारशा चुका झाल्या नाहीत. सर्वांनी राष्ट्राचा विकास करून सुरक्षितता निर्माण करण्यासाठी प्रयत्न केले आहेत.

अठरापगड जाती-धर्माचा हा देश किरकोळ कुरबुरी वगळता शांततेत जगत आहे. भारतातील कुठलाही मुस्लीम बांधव देश सोडून पाकिस्तानात जाणार नाही, एवढा हा समाज भारतात सुरक्षित आहे. आता प्रश्न असा उरतो की निवडणुका होईपर्यंत शाब्दिक धुळवड रंगणार, रंगपंचमीचा काळा रंग एकमेकांना फासणार, त्याला कोण रोखणार? ते होऊनच जाऊ द्या, म्हणजे कोण सच्चा और कौन झुठा हे मतदार ठरविणार आहेत. प्रत्येक पक्षाला उमेदवार ठरविण्याचा, प्रचार करण्याचा, सभा घेण्याचा अधिकार लोकशाहीने दिला आहे.

मात्र या वेळेची खरी लढत भाजप व काँग्रेसमध्येच असेल. महागठबंधन हा फार्स ठरण्याची शक्यता नाकारता येत नाही. कडबोळ्याच्या सरकारमध्ये मंत्री, पंतप्रधान यावरही कलह होऊ शकतो. कदाचित 2020 मध्ये पुन्हा निवडणुका होऊ शकतात. आज भाजपला 2014 सालाइतके बहुत मिळणे अवघड आहे, त्याला कारणेही अनेक आहेत. तरीही देश स्थिर ठेवायचा असेल तर एकतर भाजप किंवा काँग्रेस या दोन पक्षांच्या हातातच बहुताने सत्ता द्यावी लागणार आहे, याची मतदारांनी पूर्णपणे जाणीव ठेवूनच मतदान करावे.

 

हवाई हल्ल्याची धुळवड

 

 

हवाई हल्ल्याची धुळवड

पुलवामा येथील अतिरेकी हल्ल्यानंतर लगोलाग भारतीय हवाईदलाने थेट पाकिस्तानात घुसून जैशच्या तळावर हल्ला करून दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त केले. जगातील कोणत्याही देशांनी सीमारेषा ओलांडून हल्ला केल्याचा निषेध आजवर केलेला नाही. अगदी पाकच्या संधीसाधू जोडीदार असलेल्या चीननेदेखील मूग गिळून गप्प बसणेहा पर्याय स्वीकारला. जगाने अप्रत्यक्षपणे भारताची पाठच थोपटली आहे. त्यानंतर पाकनेही भारतीय सीमारेषांचे उल्लंघन करून एफ-16 ही अमेरिकन बनावटीची विमाने भारतावर हल्ला करण्यासाठी पाठविली होती.

ती विमाने अंतर्गत सुरक्षेसाठी अमेरिकेने पाकला दिली होती. त्या कराराचा भंग झाल्याने ट्रम्प सरकार पाकला जाब विचारणार आहे. एफ-16 हे एक विमान पाडताना विंग कमांडर अभिनंदन वर्धान पाकिस्तानी लष्कराच्या हाती लागले. 1949च्या जिनिव्हा कराराप्रमाणे व आंतरराष्ट्रीय दबाव वाढल्याने पंतप्रधान इम्रानखान यांना दाती तृण घेऊन कमांडरची सुटका करणे भाग पडले. या सगळ्या घडामोडी घडत असताना आता भारतीय लोकशाहीच्या लोकसभा निवडण का उंबरठ्यावर येऊन ठेपल्या आहेत. हुतात्मा जवान राहिले बाजूला, भाजप सरकार व विरोधकांचे महागठबंधन यांच्यात रोज ह्या हवाईहल्ल्याचा उपयोग करून घेण्याचा प्रयत्न सुरू आहे.

शत्रूच्या घरात घुसून दहशतवाद्यांना आम्ही ठेचू शकतो, तर भारताच्या हल्ल्यात किती दहशतवादी ठार झाले, यालाच प्रचाराच्या रणधुाळीत महत्त्व प्राप्त झाले आहे. कपिल सिब्बल यांच्यासारखे कायदेतज्ज्ञ, केजरीवाल, राहुल गांधी, मनिष तिवारी, शरद पवार, ममता बॅनर्जी, सुरजेवाला, मायावती अशा अनेक भाजपविरोधी नेत्यांनी हल्ल्याचा पुरावा द्यावा अशी मागणी केली आहे, तर रिअलिटी शोमध्ये खदाखदा खोटे हसणारे एक विदूषक जाहीर करतात की, भारताने दहशतवादी नाहीतर 300 झाडे नष्ट केली. हा-हा-हा. किती दहशतवादी ठार झाले, या संख्येवरून सत्ताधारी व विरोधक यांनी धुश्‍चक्री माजवणे मुळातच गैर आहे. पण निवडणुकाुंळे कोणालाच याचे भान राहिले नाही असे चित्र आहे. वास्तविक या संपूर्ण प्रश्नाला अनेक पैलू आहेत.

भारतावर झालेले असंख्य हल्ले, 42 जवानांचे हुतात्मा होणे, भारत-पाकिस्तानचे तणावाचे संबंध, काश्मीर नक्की कोणाच्या मालकीचा, पाश्चात्त्य देशांचा दोन्हीकडे झुकता कल याकडे दुर्लक्ष करून दहशतवादाचे संपूर्ण निर्मूलन करण्याची गरज असताना देशातील सर्वच पक्ष भारताच्या संरक्षणदलाविषयी ऊहापोह करत आहेत याची शरम वाटते. लोकसभा निवडणुकांआधी हा हवाईहल्ला केल्याने हा विषय भाजपने जाहीर सभांधून मांडण्याचा तडाखा सुरू केला आहे. जणू काही शूर आम्ही सरदार आम्हाला काय कोणाची भीतीअसा आविर्भाव आणला जात आहे, तर उलट हल्ल्याचा पुरावा द्यावा असा विरोधकांचा आग्रह आहे.

याविषयी हवाईदल प्रमुख व एअर चीफ मार्शल बी. एस. धनोआ यांनी केलेले स्पष्ट वक्तव्य देशातील सर्व राजकीय नेत्यांनी लक्षात घेण्याजोगे आहे. राजकारणाच्या साठमारीत ते घायाळ करणारे आहे. त्यांनी सर्व देशाला व राजकीय नेत्यांना खडसावून सांगितले आहे की, “लक्ष्यभेद झाला अथवा नाही केवळ याकडेच हवाई दलाचे लक्ष असते, किती दहशतवादी मारले गेले, हे मोजण्याचे काम पाकिस्तानचे आहे.

अजूनही आम्ही ही मोहीम थांबविली नाही.त्यांच्या म्हणण्याप्रमाणे त्या रात्री जैश-ए-महंदअड्ड्यावर 300 (तीनशे) मोबाईल अ‍ॅक्टिव्ह होते. तांत्रिक पाहणीत ही माहिती समोर आली आहे. इंदिराजींनी 1971 साली सीमारेषा ओलांडून पाकिस्तानचे दोन तुकडे केले आहेत, तेव्हा कोठे एवढा गदारोळ झाला होता? मग आजच का? दिल्लीत सत्ता कोणाची येणार हे मतदार ठरवणार. पण आठवडाभरावर आलेली धुळवड एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करून आजच साजरी करू नका.

 

अखेर ठेचले

अखेर ठेचले

भारतीय केंद्रीय राखीव दलाचे 42 जवान जैश-ए-महंद या पाक धार्जिण्या संघटनेने केलेल्या भीषण हल्ल्यात हुतात्मा झाले होते. 14 फेब्रुवारीला केलेल्या या हल्ल्याने सारा देश संतप्त झाला होता. भारत हा सॉफ्ट पॉवर आहे, कितीही कुरापती काढल्या तरी निषेध नोंदवण्यापलीकडे जात नाही अशी समजूत पाकिस्तानची झाली होती, पण दहशतवादी कृत्ये आता भारत सहन करणार नाही असा स्पष्ट संदेश देणारी धाडसी कारवाई भारतीय हवाईदलाने केली आहे. पुलवामा येथे जवानांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा अखेर भारताने बदला घेत पाकचे जुने हिशोब चुकते केले. दहशतवादी हल्ल्याची जबाबदारी जैश-ए-महंदने स्वीकारली तरीही पाक पुरावे द्या असा कांगावा करतच राहिला. जगभरातून अनेक देशांनी निषेध व्यक्त केला.

पाकिस्तानला जगात तोंड वर करून बोलण्याची शामत राहिली नव्हती. मग पाकिस्तानी लष्कराने दहशतवाद्यांचा तळ सीमावर्ती भागातून हलवून बालाकोटजवळील नागरीवस्तीपासून दूर हलवला. त्याची माहिती भारतीय सुरक्षा दलांना व गुप्तचर संस्थांना मिळाली होती. पंतप्रधान मोदींनी तीनही दलांना पूर्ण स्वातंत्र्य दिले होते. बालाकोट हे ठाणे तसे पाकिस्तानच्या अगदी पोटात असल्याने तेथे भारत ल्ला करू शकेल याची जराही कल्पना दहशतवाद्यांना नव्हती. तरीही सोवारी पहाटे हवाईदलाच्या बारा मिराज विमानांनी थेट पाकिस्तानच्या खैबर पख्तुनख्वा प्रांतात घुसून बालाकोट येथील जैश-ए-महंद या संघटनेचा तळ नेस्तनाबूत करून तीनशेहून अधिक दहशतवाद्यांचा खातमा केला. मुझफ्फराबाद आणि चाकोडी येथील केंद्रांवर या विमानांनी अग्निवर्षाव केल्याने अवघे भूंडळ थरारले.

एवढ्या आत घुसून लष्कराला कारवाई करणे शक्यच नव्हते, ते काम हवाई दलाने केले. अवघ्या 25 मिनिटात धडक कारवाई करून सर्व विमाने सुरक्षितपणे आपल्या तळावर सुखरूप परतली, यावरून कारवाई किती फत्ते झाली याचा अंदाज येतो. त्याबद्दल अवघा देश हवाईदलाचे अभिनंदन करत आहे. त्याच वेळी अतिरेकी व पाकिस्तानी लष्कर याचा बदला घेतील काय याची चर्चा रंगणे स्वाभाविक आहे. त्यामुळेच सूड घेतला, बदला घेतला अशा प्रतिक्रिया देशभरातून उमटत असल्या तरीही भारताला स्वस्थ बसून चालणार नाही.

उलट्या कारवाईुळे संतप्त झालेला पाकिस्तान आता कोणत्याही थराला जाऊ शकतो हे गृहीत धरूनच आपल्याला यापुढे अधिक सावध राहावे लागेल. युरोपीयन राष्ट्रांनी भारताला शांततेचे आवाहन केले आहे. त्याच वेळी पाकिस्तानातील विरोधी पक्षांनी पंतप्रधान इम्रानखान यांची खिल्ली उडवून शे-शेच्या घोषणा दिल्या आहेत हे विसरून चालणार नाही. भारताने हा हल्ला लष्करी नव्हता किंवा तेथील नागरिकांवरही नव्हता तर तो तेथील दहशतवाद्यांवर होता अशी रास्त भूमिका मांडली आहे. तुम्ही दहशतवाद्यांचे तळ नष्ट करा अथवा आम्ही करू असे या हल्ल्यामागचे सूत्र आहे आणि सर्व जगाला ते पटण्यासारखे आहे. आपण दहशतवादी आणि तेथील लष्कराला सणसणीत उत्तर दिले आहे. जैश-ए-महंद भारतावर आणखी हल्ले करण्याच्या तयारीत होता,

अशा बातम्या गुप्तचर संस्थांना मिळाल्या होत्या. त्यामुळेच वेळ न दवडता या संघटनांना लक्ष करणे आवश्यक होते. 1948, 1965, 1971 व कारगील युद्धात पाकच्या छुप्या लढाईचा अंदाज आलाच आहे. आताही ते समोरासमोर युद्ध करणार नाहीत, मात्र सीमेवर कुरापती काढत राहतील. पाकिस्तानची आर्थिक अवस्था आज अत्यंत बिकट आहे, मात्र अण्वस्त्रे आहेत त्या जोरावर तेथील लष्कर माजले आहे.

आपल्या विरोधात भारत मोठी लष्करी कारवाई करण्याचे टाळेल अशा प्रकारचा गर्व अलीकडे पाकिस्तानी नेत्यांच्या वागण्या-बोलण्यातून दिसत होता. त्याला ही कारवाईची एक चपराक आहे. पंतप्रधान इम्रानखान याने शांततेची संधी देण्याची मागणी केली होती, पण तेथील लष्काराला ती पचली नाही. तिथे लोकशाही नावालाच असते, सर्व काही लष्कर सांभाळते. अविचारी पाकिस्तान कोणत्याही क्षणी आत्मघातकी कृत्ये करू शकतो. त्यामुळेच भारतीय सशस्त्र दले आणि गुप्तचर संस्थांना अधिक दक्ष राहावे लागेल.

 

पाकची आर्थिक मदत रोखा

 

 

पाकची आर्थिक मदत रोखा

पाकिस्तानने अनेक दहशतवादी संघटनांना आश्रय दिला आहे. त्यापैकी कुप्रसिद्ध संघटना म्हणजे जैश-ए-मोहम्मद. या संघटनेने पुलावामा जिल्ह्यातील अंवतीपुरानजीक केलेल्या आत्मघाती बॉम्बस्फोटात केंद्रीय राखीव पोलीस दलाचे 42 जवान शहीद झाले. जैशच्या कृत्याने देशभरात संतापाची लाट उसळली आहे तर जगभरातून निषेध व्यक्त होत आहे. अदिल अहमद दार या दहशतवाद्याने स्फोटके भरलेली कार जवानांच्या ताफ्यावर धडकावून रक्तरंजित हत्या केली. अडीच हजारापेक्षा जास्त जवान रजेवरून परत आल्यावर एवढ्या लांब टप्प्यासाठी प्रवास करत होते.

त्यांना विमानाने नेले असते तर ही घटना घडली नसती अशी लष्कराचे काही अधिकारी आज कुजबूज करीत आहेत. रस्त्यानेच जायचे होते तर वाटेत काही दगाफटका होणार नाही, याचीही खबरदारी घेण्यात आली नव्हती, असे या घटनेवरून सिद्ध झाले आहे. हल्ल्याचा खरा सूत्रधार जैशेचा मुख्य दहशवादी मसूद अजहरच आहे आणि तो पाकिस्तानामधील सैनिक रुग्णालयात गेल्या चार महिन्यांपासून अ‍ॅडमिट नव्हे तर दडून बसला आहे, असे खात्रीलायक वृत्त आहे. दार याने मोटार धडकविण्याआधी एक व्हिडिओ व्हायरल केला आहे.

तो अनेकांनी पाहिला आहे. मी वर्षापूर्वी या संघटनेत सामील झालो, माझ्यावर जे काम सोपविले आहे ते मी नीटपणे पार पाडणार आहे. जेव्हा तुम्हाला ही बातमी कळेल, तेव्हा मी स्वर्गात असेल,’ असे वक्तव्य त्याने केले आहे. महम्मदअसे नाव लावून तुम्ही दहशतवादी कारवाया करता, पैगंबरांचा जराही मामुली अंश या हरामखोरांच्यात नाही, पण हे स्वर्गात जाण्याची भाषा करतात. नरकाचेही दरवाजे तुच्यासाठी बंद झाले आहेत हे विसरू नका. उगाचच एखाद्या महात्म्याचे नाव जैश खराब करत आहे. पैगंबरच तुम्हाला धुळीला मिळवतील, त्याआधीच सावध व्हा. भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल हे आपला परदेशी दौरा सोडून भारतात परतले आहेत.

मागील सर्जिकल स्ट्राईक त्यांच्याच मार्गदर्शनाने पार पडला होता. मोदींनी तिन्ही दलांना पूर्ण स्वातंत्र्य दिले आहे. पाकिस्तानविषयक मोस्ट फेवर्ड नेशन हा दर्जाही आता इतिहासजमा झाला आहे. पाकिस्तान आयात करत असलेल्या वस्तूंवर 200 टक्के कर लावण्यात आला आहे. म्हणजे आता भारतात त्यांची कोणतीच वस्तू खपणार नाही. जम्मू-काश्मीरमधील काही फुटीरवादी नेत्यांचे संरक्षणही काढून घेतले आहे. तसेच त्यांच्या इतर सवलती बंद करण्यात येणार आहेत. हे सर्व ठीक असले तरी आता युद्ध नको, थोडे थांबावे.

आपल्याकडील निवडणुका उरकून घ्याव्यात म्हणजे आपली प्रतिमा स्वच्छ करून मग धडा शिकवावा. पाकला नमविण्यासाठी अनेक पर्याय पुढे आले आहेत. पण त्याचा कोणताही वापर न करता एक सोपा पर्यायी मार्ग भारताकडे आहे. पाकमध्ये दहशतवादी संघटनांना थारा दिला जातो. त्यांना तिथे आश्रय लष्कर देते. सर्व अऐहिक सुखे त्यांच्या पायाशी लोळतात हे कटू सत्य भारताने सर्व जगाला राजनैतिक पातळीवरून पटवून द्यायला हवे. पाकची आर्थिक आवक जगभरातून बंदकरावी लागेल.

अगदी जागतिक बँकेवर दबाव आणून तुची पुंजी जगाला नष्ट करण्यासाठी वापरत आहात याची जाणीव करून द्यावी लागेल. सर्व बाजूंनी आर्थिक आवक बंद झाल्यावर चीन किती दिवस मदत करतो व त्याची ताकद किती आहे याचाही अंदाज येईल. पाकला साथ देणार्‍या चिनी बनावटीच्या वस्तू भारतीय बाजारपेठातून हद्दपार आपण नागरिक करू शकतो. पाकिस्तानबरोबर युद्ध नको,

पण त्यांची जागतिक फुकटी आर्थिक आवक रोखली तर तेथील लष्कर व सरकार दहशतवाद्यांना फार थारा देणार नाहीत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या चातुर्यांची रणनीती वापरा आणि पाकला धडा शिकवा. साप्ताहिक अंबरतर्फे सर्व शहिदांना विनम्र श्रद्धांजली!

 

थंडीचा थरार

 

 

थंडीचा थरार

आपल्या देशात वातावरणाचे तीन टप्प्यात पूर्वीपासूनच विभाजन झाले आहे. प्रथम उन्हाळा, मग पावसाळा नंतर हिवाळा. तिन्हीही ऋतू अगदी वेळेवर हजेरी लावायचे. जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात पावसाळ्याला हमखास सुरुवात व्हायची. दसर्‍यानंतर हिवाळा चालू व्हायचा. ऐन दिवाळी सणात कुडकुडत अभ्यंग स्नान घरोघरी होत असे. मकर संक्रात झाली की थंडी गायब व्हायची. त्या काळी हे तीनही ऋतू वेळेवर हजेरी लावायचे. पण मागील दहा-पंधरा वर्षापासून या ऋतूच्या मोसमांनी मानवाशी पंगा घेतला आहे.

वातावरणाचे अंदाज कोणीच नक्की देऊ शकत नाहीत. अगदी हवामान खातेही निष्प्रभ ठरत आहे. एवढे बदल वातावरणात होत आहेत. मकर संक्रांत तर सोडाच, वसंत पंचमीची चाहुल लागल्यानंतरही स्वेटर, मफलर, कानटोप्या घातलेले नागरिक आजही रस्त्यावर दिसत आहेत, तर ज्येष्ठ नागरिक सायंकाळी बाहेर जाण्याचे टाळत आहेत. पूर्वी ठराविक भागातच थंडी व उन्हाळा जास्त असायचा.

यंदा बाकी होळी जवळ आली तरी संपूर्ण महाराष्ट्र गारठलेला आहे. हे काहीच नाही, उत्तर भारतातील सहा ते सात राज्यात हिमकण व गारपीट होत आहे. महाराष्ट्रातही काही ठिकाणी गारपीट झाल्याच्या बातम्या आहेत. थंडीचा मोसम वाढल्याने शेतीचेही नुकसान होत आहे. थंडीमुळे धान्य, कडधान्य, फळे, फुले, कापूस यांची उत्पादने काळी पडू लागली आहेत. थंडीच्या गारठ्याने आधार नसलेले अनेक ज्येष्ठ, गोरगरीब थंडी सहन न झाल्याने मृत पावल्याच्या बातम्या रोज दैनिकांतून वाचण्यास मिळत आहेत. त्याच वेळी अनेक सेवाभावी संस्था भर मध्यरात्री या अनाथांना ब्लँकेटची उब देण्यास धडपडत आहेत. मराठवाडा व विदर्भ इथे आपल्यापेक्षा जास्त थंडी आहे.

जम्मू-काश्मीरमध्ये तापमान शून्य अंश सेल्सियसखाली गेले होते. रस्त्यावर सर्वत्र बर्फ साचल्याने वाहतूक ठप्प झाली होती. देशात अनेक ठिकाणी हिमकणांची पखरण दिसून आली. अस्मानी संकटांचा आता सामना करावाच लागेल. पूर्वी मुंबईकरांचा थंडीशी थोडासा संबंध येई, पण यावर्षी बाकी सर्दी-खोकल्याच्या रुग्णांनी सरकारी व खासगी इस्पितळे गजबजली, थंडीच्या पाठोपाठ रोगराईचा प्रादुर्भाव होण्याची शक्यताही वर्तविली जात असल्याने काळजी करण्यासारखी परिस्थिती आहे. जगाच्या कोणत्याही भागात थैान घालणारा पाऊस,

घाम फोडणारा उन्हाळा, गारठून टाकणारी थंडी ही मानवापुढील नैसर्गिक संकटे ठरत आहेत. फार पूर्वी तीनही ऋतू सुसह्य असायचे. ठराविक वेळेत आगमन व्हायचे व वेळेत दुसर्‍या ऋतूला वाट मोकळी करून द्यायचे. पावसात क्वचित गाराही पडायच्या, त्याचा आनंद वाटायचा. पण पाऊस नाही फक्त हिमकण व गारपीट होते तेव्हा बाकी विचार करावा लागतो. त्याला कारण आहे. पृथ्वीच्या हवामानात होणार्‍या घातक बदलांचा हा परिपाक आहे.

वातावरणातील ओझोन वायू हा मानवासाठी टॉनिक आहे, आणि तोच आज पृथ्वीजवळ येण्यास तयार नाही त्याला कारण आहे पृथ्वीवरील महाभयंकर कार्बन वायू. उष्णकटिबंधक प्रदेशातही हिमचटके बसत असतील तर माणसाला जागृत व्हावे लागेल. जागतिक हवामानात घातक बदल होत चालल्याची हाकाटी वैज्ञानिक वेळोवेळी देत आले आहेत. तसेच चीन व भारत हे प्रचंड लोकवस्तीचे देश जागतिक पर्यावरणात अडथळे ठरत असल्याची बोंब फार पूर्वीपासून आहे. चंगीभंगी संस्कृती व भोगवृत्ती यातून मानवाने चालविलेला सृष्टीच्या मनमुराद संहाराचा हा परिणाम असून यातून वाचण्याची वेळ दूर जात आहे.

हा सारा निसर्गाला छेडण्याचा दंड आहे हे कोणी विसरू नका. शेकड स्वयंसेवाभावी संस्था पर्यावरण जतनाच्या कामी खपत असल्या तरी त्यांचे कार्य सत्कारणी लागतेच असे नाही. यंदा थंडीने दिलेला झटका, ‘थरार’, अतिपाऊस, अवर्षण, गारपीट, भूकंप, सागराचे पृथ्वीच्या दिशेने होणारे अतिक्रमण या भयानक संकटांना आपल्या सर्वांनाच सामोरे जायचे आहे, हे प्रत्येकाने नीट लक्षात ठेवावे.

 
 • «
 •  Start 
 •  Prev 
 •  1 
 •  2 
 •  3 
 •  4 
 •  5 
 •  6 
 •  7 
 •  8 
 •  9 
 •  10 
 •  Next 
 •  End 
 • »


Page 1 of 66

वाचकांची संख्या

ह्या पानावर आत्तापर्यंत आलेल्या वाचकांची संख्या: 139

era

little-birdies


amber saptahik amber weekly amber e-amber eamber marathi news marathi batmya talegaon news talegaon batmya lonavala news lonavala batmya chakan news chakan batmya 
maval news maval batmya pimpri news pimpri batmya chinchwad news chinchwad batmya pune news pune batmya maharashtra news maharashtra batmya  talegaon chakan
lonavala pimpri chinchwad pune real estate talegaon real estate chakan real estate lonavala real estate pimpri real estate chinchwad real estate maval real estate pune real estate
classifieds talegaon classifieds chakan classifieds maval classifieds lonavala classifieds pimpri classifieds chinchwad classifieds pune classifieds